तो जिममध्ये व्यायाम करत होता, अचानक ट्रेनरने डोक्यावर दांडका हाणला अन्..
जीममधील सदस्यावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी अखेर ट्रेनरला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात केलेल्या काही विनोदामुळे तो नाराज झाल्याने त्याने हा पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे.
मुंबईतील मुलुंड येथून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. शहरातील एक जिममध्ये व्यायामासाठी गेलेल्या व्यक्तीवर त्याच जिममधील ट्रेनरने लाकडी मुदगलने वार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे तो माणूस गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याल बराच मार लागला आहे. सदस्यावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी जिम ट्रेनरला अटक करण्यात आली आहे. पीडित इसम व त्याचे काही मित्र व्यायाम करताना बोलत बलोत हसत होते. जट्रेनरला उद्देशून केलेल्या काही विधानामुळे तो चिडला आणि त्याने थेट लाकडी दांडकाच त्या माणसाच्या डोक्यात हाणला. युगेश शिंदे ( वय २०) असे जखमी तरूणाचे नाव असून धवल नाकेर असे जिम ट्रेनरचे नाव आहे. याप्रकरणी जिम ट्रेनरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
जिममध्ये व्यायाम करताना अचानक ट्रेनर आला अन् लाकडी मुदगल
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी तरूण युगेश शिंदे (२०) हा मुलुंड पूर्वेकडील फिटनेस इंटेलीजन्स जीममध्ये व्यायामासाठी जातो. घटनेच्या दिवशी व्यायाम सुरू असतानाच युगेश व जिममधील इतर काही तरूण बोलत होते. तेव्हाच ट्रेनर धरव त्याच्याकडे बघत होता. नंतर सगळ्यांनी गप्पा थांबवून व्यायामाकडे लक्ष दिले. नंतर ट्रेनर धवल व्यायामासाठी वापरले जाणारे लाकडी मुदगल उचललं आणि पुढे चालत जाऊन अचानक युगेशच्या डोक्यावर मुदगलने वार केला. या हल्ल्यामुळे तो हबकला आणि डोकं धरून कसाबसा खाली बसला.
हल्ला झाल्याचे दिसताच जिममधील इतर व्यक्तींनी आक्रमक ट्रेनर धवलला रोखत त्याला बाजूला ढकललं. जोरात मार लागल्याने युगेश शिंदे अस्वस्थ झाला. त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागल्याने इतरांनी त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा एमआरआय करण्यात आला. युगेशच्या डोक्याला बराच मार लागला असून त्याच्या कवटीच्या डाव्या बाजूला दोन फ्रॅक्चर झाल्याचेही समोर आले.
Crazy, a Trainer at Fitness Intelligence Gym @ Mulund East hits a member. Person seriously injured and the Trainer has been arrested Via : @PatrakarNManiar pic.twitter.com/9yOJIIBX5d
— मुलुंड info (@mulund_info) July 18, 2024
या घटनेची माहिती मिळताच नवघर पोलिस ते घटनास्थळी दाखल झाले. युगेश शिंदे याच्या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रेनरला अटक करण्यात आली असून पोलिसांनी नाकेरविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.