Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : दादर स्टेशनवर एक्स्प्रेसच्या टॉयलेटमध्ये प्रवाशाची आत्महत्या, टॉवेलने गळफास लावत संपवलं आयुष्य

दादर रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या राणकपूर एक्स्प्रेसमधील बाथरूममध्ये एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. आरपीएफने केलेल्या तपासणीत ही घटना उघड झाली. त्याने टॉवेलने गळफास लावून आत्महत्या केली होती. पोलिसांना त्याची ओळखपत्रे किंवा मोबाईल सापडला नाही. मृताची ओळख पटवण्यासाठी आणि आत्महत्येच्या कारणांचा तपास सुरू आहे.

Mumbai Crime :  दादर स्टेशनवर एक्स्प्रेसच्या टॉयलेटमध्ये प्रवाशाची आत्महत्या, टॉवेलने गळफास लावत संपवलं आयुष्य
रेल्वेच्या टॉयलेटमध्ये तरूणाने संपवलं जीवनImage Credit source: प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 31, 2025 | 8:24 AM

मुंबईतील दादर रेल्वे टर्मिनलवर उभ्या असलेल्या एका एक्स्प्रेसमध्ये एका इसमाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने प्रचंड खलबळ माजली. ही घटना रणकपूर एक्स्प्रेसमध्ये घडली असून त्या रेल्वेच्या टॉयलेटमध्ये इसमाचा मृतदेह सापडला. त्याने टॉवेलच्या सहाय्याने गळफास लावत त्याचं आयुष्य संपवलं. बुधवारी संध्याकाळी रणकपूर एक्स्प्रेस ही दादर स्टेशनवर आल्यानंतर आरपीएफकडून ट्रेनची तपासणी करण्यात येत होती, तेव्हा ही घटना उघडकीस आली. यामुळे मोठी खळबळ माजली असून रेल्वे पोलिसांनी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृतेदहाची ओळख पटवून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात पोलिस व्यस्त आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी उशीरा रणकपूर एक्स्प्रेस दादर स्टेशनवर आली. गाडी रिकामी झाल्यानंतर आरपीएफ जवानांकडून संपूर्ण ट्रेनची तपासणी करण्यात येत होती. तेव्हा एक्सप्रेसच्या एका डब्याचे बाथरूमचे दार आतून बंद होते. आरपीएफ पोलिसांनी आतील व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, दरवाजा ठोठावूनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही. आतून कोणी आवाज दिला नाही, दरवाजाही उघडला नाही. यामुळे पोलिसांना संशय आला. अखेर त्यांनी जोर लावून बाथरूमचा दरवाजा उघडला असता समोरचं दृश्य पाहून ते हादरलेच.

ट्रेनच्या टॉयलेटमध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केली होती. त्याने टॉवेलने गळफास लावून घेत त्याचं आयुष्य संपवलं. पोलिसांनी त्याचा मृतदेह खाली उतरवून तपासणी सुरू केली. मात्र आत्महत्या केलेल्या व्यक्तीवळून आरपीएफला कोणतेही ओळखपत्र किंवा मोबाईल फोन सापडला नाही. त्यामुळे तो कोण, त्याने हे टोकाचं पाऊल का उचललं, याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये एडीआरची नोंद केली असून या प्रकरणाचा तपास आणि मृताची ओळख पटवण्यास सुरुवात केली आहे.

राऊतांचा फोटो थेट रेड्याच्या गळ्यात, शिवसेनेचं कुठं अनोखं आंदोलन?
राऊतांचा फोटो थेट रेड्याच्या गळ्यात, शिवसेनेचं कुठं अनोखं आंदोलन?.
त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध, पोलिसात पत्र
त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध, पोलिसात पत्र.
राज्यात शिवसेनेच्या 'ऑपरेशन टायगर'चा सपाटा; कोकणानंतर आता कुठ खिंडार?
राज्यात शिवसेनेच्या 'ऑपरेशन टायगर'चा सपाटा; कोकणानंतर आता कुठ खिंडार?.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं आजपासून अन्नत्याग, 7 प्रमुख मागण्या काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं आजपासून अन्नत्याग, 7 प्रमुख मागण्या काय?.
'सकाळच्या ९ वाजताच्या भोंग्याला..', फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
'सकाळच्या ९ वाजताच्या भोंग्याला..', फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला.
"निर्लज्ज, विश्वासघातकी", गोऱ्हेंच्या आरोपांवरून ठाकरेंची सेना भडकली
भगवं मफलर अन् भगव्या टोपीत धंगेकर, धनुष्यबाण हाती घेण्याआधी NCP ची ऑफर
भगवं मफलर अन् भगव्या टोपीत धंगेकर, धनुष्यबाण हाती घेण्याआधी NCP ची ऑफर.
माणिकराव कोकाटेंना न्यायालयाकडूनदिलासा, धाकधूक कायम; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंना न्यायालयाकडूनदिलासा, धाकधूक कायम; प्रकरण नेमकं काय?.
'अन्यथा... बात निकलेगी तो फिर दूर तलक जाएगी', अंधारे गोऱ्हेंवर भडकल्या
'अन्यथा... बात निकलेगी तो फिर दूर तलक जाएगी', अंधारे गोऱ्हेंवर भडकल्या.
'12 मर्सिडीज कुठून आणल्या? गोऱ्हे नमकहराम..', ठाकरेंच्या नेत्याची टीका
'12 मर्सिडीज कुठून आणल्या? गोऱ्हे नमकहराम..', ठाकरेंच्या नेत्याची टीका.