लैंगिक अत्याचारांच्या घटनांना पूर्णविराम कधी? कल्याण पूर्वेमध्ये पुन्हा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
बदलापूरच्या घटनेनंतर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. अशातच ज्या ठिकाणी अत्याचार केलेल्या आरोपीला अटक केली होती. त्यानंतर दोन दिवसातच तिथे 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे.
मानपाडा पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या प्रवीण पाटील नावाच्या आरोपीला नाशिक मधून बेड्या ठोकल्या होत्या. या प्रकरणाला दोन दिवस ही उलटले नाही याआधीच आज पुन्हा घरासमोर खेळणाऱ्या एक 10 वर्षीय अल्पवयीन मुलीला घरात बोलून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. धर्मेंद्र यादव असे या आरोपीचे नाव असून मानपाडा पोलिसांनी याला कल्याण न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कल्याण पूर्वेच्या आडीवली परिसरातील आहे. पीडित मुलगी काही मुलांसोबत खेळत असताना एका मुलाच्या घरात गेली. त्या मुलाच्या वडिलांनी तिला आपल्याजवळ बोलावून घेतल्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणाचा खुलासा मुलीने आपल्या पालकांना सांगितल्यानंतर झाला, आणि त्यांनी तातडीने मानपाडा पोलीस ठाणे गाठले. जिथे पोलिसांनी गुन्हा दाखल करत मानपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने आणि पोलीस निरीक्षक राम चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू झाला. पोलिसांनी तत्काळ आरोपी धर्मेंद्र यादव याला अटक केली आहे. आरोपीला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
बदलापूर आणि अंबरनाथमध्येही अशा प्रकारच्या घटनांचे प्रमाण वाढत आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राज्यभरात अशा घटनांमध्ये होणारी वाढ समाजासाठी चिंताजनक आहे. या प्रकारच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर कायदे आणि तत्पर कारवाईची गरज आहे, असे नागरिकांमधून आवाज उठवला जात आहे.