राज्यात चाललंय काय ? आधी प्रियकराने प्रेयसीला मारलं, आता जावयाने सासूला संपवलं..

वसई मध्ये एका इसमाने भरदिवसा, बघ्यांसमोर, भररस्त्यात प्रेयसीची हत्या केली. या हत्याकाडांमुळे लोकांच्या अंगावर अक्षरश: काटा आला. या घटनेचे पडसाद अद्याप उठत असतानाचा आता विरारमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

राज्यात चाललंय काय ? आधी प्रियकराने प्रेयसीला मारलं, आता जावयाने सासूला संपवलं..
Follow us
| Updated on: Jun 20, 2024 | 7:48 AM

पुरोगामी राज्य म्हणवलं जाणारं महाराष्ट्र राज्य गेल्या काही दिवसांतील गुन्ह्यांच्या घटनांमुळे हादरून गेलं आहे. वसई मध्ये एका इसमाने भरदिवसा, बघ्यांसमोर, भररस्त्यात प्रेयसीची हत्या केली. या हत्याकाडांमुळे लोकांच्या अंगावर अक्षरश: काटा आला. या घटनेचे पडसाद अद्याप उठत असतानाचा आता विरारमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कौटुंबिक वादातून एका इसमाने चक्क त्याच्या सासूचीच हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. बुधवारी दुपारी (19 जून) एकच्या सुमारास विरार पूर्वेला हे हत्याकांड घडलं. विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र त्याच्याच मुलांनी त्याला घरात कोंडून ठेवल्याने अखेर तो पकडला गेला. प्रशांत खैरे असे आरोपीचे नाव असून लक्ष्मी खांबे (वय 60) असे मृत महिलेचे नाव आहे. विरार पोलिसांनी प्रशांत याला अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. वसईतील आरती यादव या तरुणीच्या हत्याकांडाला अवघे 24 तास उलटायच्या आतच हे हत्याकांड घडले असून संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे.

नक्की काय घडलं ?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला लक्ष्मी या विरारच्या साईनाथ नगर येथील जानुवाडी परिसरात रहात होत्या. त्यांची मुलगी, जावई आणि नातूही सोबत काही महिन्यांपासून त्यांच्या सोबत रहायचे. त्यांच्या मुलीचे आरोपी प्रशांत खैरे याच्याशी लग्न झाले होते. मात्र प्रशांत याला दारू पिण्याचे व्यसन असल्याने तो मद्यपान करून पत्नी कल्पना खैरे व सासू लक्ष्मी खांबे यांना शिवीगाळ करून त्रास देत होता.

हे सुद्धा वाचा

हे हत्याकांड घडल, त्या दिवशी, बुधवारी दुपारी प्रशांत हा दारू पिऊनच घरी आला होता. त्यावेळी त्याची पत्नी कामासाठी मुंबईला गेली होती. प्रशांतचा सासू लक्ष्मी बरोबर वाद झाला. याच वादातून प्रशांत खैरे याने सासूचे हात पाय बांधले आणि त्यांच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र घरात असलेल्या त्याच्या मुलांनी प्रसंगावधान दाखवलं आणि दरवाजाला कडी लावून घेतली, प्रशांतला आतंच डांबलं. मोठमोठ्याने आरडाओरडा करून त्याने आजूबाजूच्या लोकांना याची माहिती दिली. कोणीतरी पोलिसांना फोन केला. त्यानंतर विरार पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी प्रशांत विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केले आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.