Mumbai Crime : कुर्ला हादरलं ! मेट्रो साइटवर सूटकेसमध्ये सापडला महिलेचा मृतदेह

कुर्ल्यात मेट्रोचं काम सुरू असलेल्या साईटवर एका पुलाखाली बंद सूटकेस आढळली. आणि त्यामध्ये एका महिलेचा मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली. मात्र ही महिला नेमकी कोण, कुठली याबाबत अद्याप काहीही माहिती मिळू शकलेली नाही.

Mumbai Crime : कुर्ला हादरलं ! मेट्रो साइटवर सूटकेसमध्ये सापडला महिलेचा मृतदेह
Follow us
| Updated on: Nov 20, 2023 | 9:20 AM

मुंबई | 20 नोव्हेंबर 2023 : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये गुन्ह्यांच्या घटना वाढू लागल्या आहेत. अशीच एक हादरवणारी घटना कुर्ला येथे घडल्याचे उघडकीस आले आहे. कुर्ल्यात मेट्रोचं काम सुरू असलेल्या साईटवर एका पुलाखाली बंद सूटकेस आढळली. आणि त्यामध्ये एका महिलेचा मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली. अशी सूटकेस सापडल्याची माहिती मिळताच तपासासाठी गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सूटकेस उघडताच त्यामध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने सगळेच हादरले. मात्र ही महिला नेमकी कोण, कुठली याबाबत अद्याप काहीही माहिती मिळू शकलेली नाही. तिचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात दाखल करुन पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी, १९ नोव्हेंबर रोजी कुर्ला पोलीस ठाण्यात एका फोन आला. सी.एस टी.रोड शांतीनगरच्या समोरील बाजूला मेट्रो रेल्वेच्या कामाच्या जागेवरील बॅरेकेटचे आतील बाजूस एक संशयित, बेवारस सुटकेस सापडल्याते पोलिसांना सांगण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून ती सुटकेस उघडून तपासणी केली असता त्या सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला. मात्र ही महिला कोण, तिचा खून कुणी केला, ती सूटकेस कोणी टाकली, या सर्व प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीत. पोस्टमॉर्टमसाठी पोलिसांनी तो मृतदेह राजावाडी रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांच्या सांगण्यानुसार, ती महिला अंदाजे 20 ते 25 वयोगटातील असल्याचे समजते. तिने टीशर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घातलेली होती. तिचा मृतदेह सूटकेसमध्ये दुमडलेल्या अवस्थेत सापडला. मात्र तिची ओळख पटवणारी कोणतीही गोष्ट सुटकेसमध्ये आढळली नाही. कुर्ला पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. मुंबई शहरात किंवा आजूबाजूच्या परिसरात कोणत्या महिलेची बेपत्ता असल्याची तक्रार आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत. तसेच जिथे ही सूटकेस आढळली , त्या परिसराती सीसीटीव्ही फूटेजही तपासण्यात येत आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.