Mumbai Crime : जरा पाणी देता का ? विचारत घरात शिरायच्या आणि माल लुटून फरार व्हायच्या, धूमाकूळ घालणाऱ्या ‘लेडीज गँग’च्या तिघींना अटक

घरात एकट्या राहणाऱ्या आणि वृद्ध व्यक्तींना हेरून काहीतरी खोटा बहाणा करून त्यांच्या घरात घुसून मौल्यवान वस्तू लुटणाऱ्या लेडीज गँगच्या तिघींना अटक करण्यात आली आहे.

Mumbai Crime : जरा पाणी देता का ? विचारत घरात शिरायच्या आणि माल लुटून फरार व्हायच्या, धूमाकूळ घालणाऱ्या 'लेडीज गँग'च्या तिघींना अटक
Follow us
| Updated on: Nov 03, 2023 | 2:09 PM

मुंबई | 3 नोव्हेंबर 2023 : दादर- माटुंगा परिसरात धुमाकूळ घालत दहशत पसरवणाऱ्या ‘लेडीज गँग’मधील तीन महिलांना माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे. घरात एकट्या राहणाऱ्या आणि वृद्ध व्यक्तींना हेरून काहीतरी खोटा बहाणा करून त्यांच्या घरात घुसून मौल्यवान वस्तू लुटणाऱ्या या तिघींच्या कारनाम्यामुळे सामान्य नागरिक चांगलेच धास्तावले होते. त्यांच्या कारनाम्याचा फटका अनेक जणांना बसल्यावर पोलिसांत तक्रारीही वाढल्या होत्या. त्यानंतप पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त वाढूवन गस्त घालण्यास सुरूवात केली.

अखेर याप्रकरणी पोलिसांनी तिघींना अटक केली आणि एका अल्पवयीन मुलीलाही ताब्यात घेतले. आरएके मार्ग आणि नेहरू नगर पोलिस ठाण्यात महिलांवर अशाच प्रकारे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

अनेकांना बसला महिला चोरांचा फटका

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑक्टोबर रोजी सकाळी पावणेबाराच्या सुमारास दादर पूर्वेकडील हिंदू कॉलनी येथे राहणारे संजीव पारेख (62) यांच्या कार्यालयात एक किशोरवयीन मुलगी घुसली. पारेख यांच्याशिवाय तेथे कोणीच नाही हे तिने हेरलं आणि तिच्यामागोमाग आणखी तिघीही आत शिरल्या. त्यानंतर एका महिलेने पारेख यांच्याकडे पाणी मागितले, ते आत गेल्यावर त्या महिलांपैकी एकीने तेथील मोबाईल आणि २ हजार रुपयांची रोख रक्कम चोरली, असे पोलिसांनी सांगितलं.

या घटनेनंतर काही वेळातच दादर आणि माटुंगा येथील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले. या महिलांना त्यांच्या इमारतीच्या आवारात पाहिल्याचा दावा, एकामागोमाग एक अशा बऱ्याच नागरिकांनी केला. या या व्हिडिओमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

माजी नगरसेविकेकडेही केली तक्रार

या घटनेनंतर त्या परिसरातील अनेक रहिवाशांनी माजी नगरसेविका नेहल शाह यांच्याकडे यासंदर्भातही तक्रार केली. घराचे दार उघडं असताना, कोणीतीरी आत शिरून मोबाईल चोरला अशा अनेक तक्रारी त्यांच्यासमोर आल्या. कित्येकांनी तर चोरांचे व्हिडीओही शाह यांना पाठवले. त्यानंतर शाह यांनी ताबडतोब या घटनेची माहिती माटुंगा पोलिसांना दिली. तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि त्या परिसरातील नागरिकांनाही सतर्क राहून नजर ठेवण्याचे आवाहन केले.

लेडीज गँगमधील या महिला एका कार्यकर्त्याला भालचंद्र रोडवर दिसल्यावर त्यांनी लगेच पोलिसांना कळवले आणि पोलिसांनी तातडीने कारवाई केली. पोलिसांच्या मोबाईल व्हॅन क्र. 2 आणि 5 ने गस्त घालण्यास सुरुवात केली. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या 3 महिला त्यांना दिसल्यावर त्यांनी ताबडतोब त्या तिघींना आणि एका अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

चौकशीत केला गुन्हा कबूल

पोलिसांनी त्या तिघींची कसून चौकशी केल्यावर त्यांनी चोरीची कबूली दिली. आम्ही माटुंगा आणि दादर परिसरातील घरांमधून मोबाईल्स आणि रोख रक्कम लुटत असल्याचे त्यांनी कबूल केले. रेखा राठोड (वय 35), निली पवार (वय 30), आणि मनिषा पवार ( वय20) अशी त्या तिघींची नावे आहेत. अल्पवयीन मुलीचे नाव उघड करण्यात आलेले नाही. पोलिसांनी त्या तिघींकडून सुमारे 34 हजार रुपये किमतीचे 6 मोबाईल्स आणि 2 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली.

कशी होती मोडस ऑपरंडी ?

त्या तिन्ही महिला आणि ती अल्पवयीन मुलगी या सर्वजणी गुजरातमधील आहेत. ज्या घराचा दरवाजा उघडा असेल किंवा ज्या घरात एखादी वृद्ध व्यक्ती असेल, अशा घरांवर या महिला लक्ष ठेवायच्या. गँगमधील एखादी महिला पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात शिरायची, समोरच्याला बोलण्यात गुंतवून ठेवायची. त्याचवेळी गँगमधील दुसरी एखादी महिला हळूच आत शिरून तेथूल मौल्यवान वस्तू, मोबाईल वगैरे चोरायची आणि मग त्या सर्वजण तेथून फरार व्हायच्या, अशी त्यांची गुन्ह्याची पद्धत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यांनी आत्तापर्यंत आरएके मार्ग आणि नेहरू नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत चोरी केल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाल्याचेही पोलिसांनी सांगितले.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.