मुंबई : मुंबईमध्ये (Mumbai) गेल्या चार वर्षांमध्ये झालेल्या चोरीच्या विविध घटनेत जवळपास 460 कोटी 48 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. त्यापैकी जवळपास 163 कोटी 24 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना (Police) परत मिळवण्यात यश मिळालंय. मात्र, अद्याप जवळपास 303 कोटी 79 लाख रुपयांचा मुद्देमाल परत मिळवता आलेला नाही. मिळालेल्या माहितीप्रमाणे मुंबईत कोरोनाकाळात (Corona) लॉकडाऊनदरम्यान 84 कोटी 77 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणावर चोऱ्यांच्या प्रकरणात वाढ होत असल्याची चर्चा सुरू आहे. चोऱ्यांचे प्रमाण वाढण्याचे आकडे पाहिले तर 2018 ते 2021 या चार वर्षात चोरीला गेलेल्या एकूण मुद्देमाल पैकी जवळपास 303 कोटी 79 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना परत मिळवण्यात अद्याप यश आलेलं नाही. मिळालेल्या माहितीप्रमाणे या चार वर्षात चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळवण्याचं प्रमाण फक्त 35 टक्के आहे .
एकंदरीत मिळालेल्या माहितीप्रमाणे छोट्या मोठ्या चोर्या सोन साखळी चोरी घरफोडी लूटमार दरोडे आणि वाहनांची चोरी असा प्रकारे विविध चोऱ्यांचे आकडेवारीच्या यामध्ये समावेश आहे. 2018 ते 2021 या कालावधीत अनुक्रमे 129.33 कोटी, 124.48 कोटी, 84.37 कोटी आणि 122.3 कोटी रुपये मूल्याच्या मुद्देमालाची चोरी झाली. या चार वर्षांत अनुक्रमे 40.47 कोटी, 41.85 कोटी, 27.77 कोटी आणि 53.15 कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना परत मिळविण्यात यश आला आहे .
(वर्ष, चोरी, परत)
मुंबई पोलिसांच्या प्रत्येक पोलीस ठाण्यात मुद्देमाल परत मिळवण्यासाठी किंवा चोरीच्या प्रकरणांचा छडा लावण्यासाठी स्वतंत्र तपास पथक आहेत. या पथकामध्ये दोन ऑफिसर्स आणि काही कॉस्टेबल यांचा समावेश आहे. या टीम्स दोन शिफ्टमध्ये काम करतात. संबंधित पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस इन्स्पेक्टर या टीमच्या नेतृत्व करतात आणि मुद्देमाल परत मिळवण्याचा प्रमाण जास्त असल्यासाठी गुन्हेगाराचा शोध लवकर लागणे हा सर्वात महत्त्वाचा आहे. पण, डिटेक्शन टीमला एकाच वेळी सरसरी 50 पेक्षा जास्त गुन्ह्यांची प्रकरणे हाताळली लागतात तर काही पोलिस स्टेशनमध्ये तर हे प्रमाण शंभरच्या वरही असतात. त्यामुळे कामाच्या खूप मोठा ताण या पोलीस अधिकाऱ्यांवर असतो, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे .
कोरोनादरम्यान संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन लावला होता. मात्र. मुंबईमध्ये वेगवेगळ्या चोऱ्यांच्या घटनेमध्ये जवळपास 84 कोटी 37 लाख रुपयांच्या मुद्देमाल चोरीला गेला असल्याची माहिती मिळाली आहे. त्यापैकी मुंबई पोलिसांना 27 कोटी 77 लाख रुपयांचा मुद्देमाल परत मिळवण्यात यश मिळालं आहे.