वसईत 6 वर्षाच्या मुलीचे अपहरण, मालाड रेल्वे स्थानकात मुलगी सापडली; वालीव पोलिसांच्या ताब्यात आरोपी
सीसीटिव्ही फुटेचमध्ये आरोपी दिसत असल्याने आरोपीचा शोध घेणे पोलिसांना सोप्पे गेले.
वसई – वालीव पोलीस (valiv police) ठाणे हद्दीत 6 वर्षाच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून एकाने अपहरण केले. दोन दिवसानंतर ती मुलगी मालाड रेल्वे स्थानकात (malad railway station) पोलिसांना आढळून आली, त्यानंतर रेल्वे पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता पोलिसांना धक्का बसला. पोलिसांनी तात्काळ सीसीटिव्ही (cctv) तपासले आणि आरोपीचा शोध घ्यायला सुरूवात केली. तसेच मुलीच्या पालकांचाही शोध घ्यायला सुरूवात केली. चौकशीत मुलगी वालीव पोलिस ठाणेच्या हद्दीत राहत असल्याचे स्पष्ट झाले. मुलीची आरोग्य आणि इतर तपासणी करण्यात आली असून ती व्यवस्थित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मालाड रेल्वे स्थानकातील पोलिसांनी सीसीटिव्ही तपासणी केली, त्यामध्ये आरोपी दिसत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांची तपासाची चक्र फिरवली आणि 24 तासाच्या आत आरोपीला ताब्यात घेतले.
चॉकलेटचं अमिष दाखवून अपहरण
कंसा सिंग असं आरोपीचं नाव असून तो आरोपी सुध्दा त्याच परिसरात राहत होता. त्याने लहान मुलीला चॉकलेटचं अमिष दाखवून अपहरण केलं. त्याने अपहरण का केलं हे अद्याप पोलिसांनी स्पष्ट केलेलं नाही. त्या मुलीला कंसा सिंग याने चार तारखेला घरातून पळवलं होतं त्यानंतर मुलीच्या पालकांनी वाळीव पोलिस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार केली होती. मुलीला शोधून थकलेल्या आणि घाबरलेल्या पालकांना पाहून पोलिसांनी सुरूवातीला पालकांची चौकशी केली. चौकशी केल्यानंतर पोलिसांनी तिथला परिसर पालथा घातला परंतु पोलिसांच्या हाती काहीचं लागलं नाही. दोन दिवसानंतर मुलगी सापल्याची माहिती मालाड पोलिसांनी जाहीर केली. त्यावेळी मुलीच्या पालकांनी जाऊन पाहणी केल्यानंतर ती मुलगी त्यांचीच असल्याची पोलिसांना खात्री झाली.
आरोपीला 24 तापसात बेड्या
सीसीटिव्ही फुटेचमध्ये आरोपी दिसत असल्याने आरोपीचा शोध घेणे पोलिसांना सोप्पे गेले. मालाड परिसरातील अनेक महत्त्वाचे सीसीटिव्ही आणि वालीव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सीसीटिव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी 24 तासाच्या आत आरोपीला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीची चौकशी केली. चौकशीत कोणत्या कारणामुळे मुलीचं अपहरण केलं हे अद्याप पोलिसांनी सांगितलेलं नाही. आरोपीच्या अटकेनंतर अवघ्या 4 दिवसात वालीव पोलिसांनी वसईल न्यायालयात दोषारोपपत्र ही सादर केले. दोषारोपपत्रातील सबळ पुराव्याच्या आधारे वसई न्यायालयाने आरोपीला 2 वर्षांची शिक्षा आणि 500 रुपयांचा दंड सुनावली आहे