एकटक बघितले म्हणून तरुणाला संपवले; धक्कादाक घटनेने सर्वच हादरले

| Updated on: Oct 24, 2022 | 10:11 PM

काही तरुण माटुंगातील एका रेस्टॉरंटमध्ये गेले होते. यावेळी पीडित तरुण त्यांच्याकडे एकटक बघायला लागला. यादरम्यान हा तरुण ज्याच्याकडे बघत होता, त्याने रागाने त्याला इशारा केला. त्यावरून वाद चिघळला.

एकटक बघितले म्हणून तरुणाला संपवले; धक्कादाक घटनेने सर्वच हादरले
चहा पिताच चौघांचा मृत्यू
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : मुंबईत माटुंगा (Matunga Mumbai) परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरून घडलेल्या या हत्येच्या (Killing for a minor reason) घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. एकटक बघण्यावरून झालेला वाद तरुणाच्या जीवावर बेतला. तीन आरोपींनी पीडित तरुणाला बेदम चोपले. बेदम मारहाणीत गंभीर दुखापत झालेल्या तरुणाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू (Youth Death) झाला. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

रेस्टॉरंटच्या आवारात घडली घटना

मुंबईसह संपूर्ण देशभरात सध्या दिवाळीचा उत्साही वातावरण आहे. यानिमित्ताने अनेक लोक घराबाहेर फिरण्यासाठी जात आहेत. त्याचबरोबर अनेक हौशी तरुण मंडळी हॉटेल्स आणि रेस्टॉरंटलाही भेट देत आहेत.

काही तरुण माटुंगातील एका रेस्टॉरंटमध्ये गेले होते. यावेळी पीडित तरुण त्यांच्याकडे एकटक बघायला लागला. यादरम्यान हा तरुण ज्याच्याकडे बघत होता, त्याने रागाने त्याला इशारा केला. त्यावरून वाद चिघळला.

हे सुद्धा वाचा

या वादात तीन तरुणांनी पीडित तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि खाली पाडले. पीडित तरुण जमिनीवर पडल्यानंतरही त्याला मारहाण सुरूच ठेवण्यात आली. मारेकऱ्यांपैकी एकाने पीडित तरुणाच्या डोक्यात बेल्ट घातला. त्यामुळे तरुणाला गंभीर दुखापत झाली आणि तो खालीच बेशुद्ध पडला.

यावेळी परिसरातील लोकांनी मारहाण करणाऱ्यांना हटकले. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले.

या घटनेची स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद झाली असून मारेकऱ्यांचा शोध सुरु करण्यात आला.

काही तासांतच तिन्ही आरोपींना अटक

तरुणाच्या हत्येचा शाहूनगर पोलिसांनी गांभीर्याने तपास सुरू केला. हत्या करून पसार झालेले मारेकरी पुढच्या काही तासांतच शाहूनगर पोलिसांच्या तावडीत सापडले. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध हत्या तसेच भारतीय दंड विधानच्या विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.

तिन्ही आरोपींना अटक करून त्यांचा कसून तपास केला जात आहे. तिघेजण याआधी कुठल्या गुन्ह्यात सहभागी होते का, याचाही शोध घेण्यात येत आहे.