Aarey Colony Leopard Attack : आरे कॉलनीतील 16 महिन्याच्या चिमुरडीवर दिवाळीच्या पहाटेच बिबट्या काळ बनून आला

आरे कॉलनीत बिबट्याची दहशत! दिवाळीच्या पहाटेच घडली काळीज पिळवटून टाकणारी घटना

Aarey Colony Leopard Attack : आरे कॉलनीतील 16 महिन्याच्या चिमुरडीवर दिवाळीच्या पहाटेच बिबट्या काळ बनून आला
बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडी ठारImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 25, 2022 | 11:58 AM

मुंबई : आरे कॉलनीत बिबट्याच्या हल्ल्याच्या (Aarey Colony Leopard Attack) अनेक घटना समोर आलेल्या आहेत. पण दिवाळीच्या पहाटेच (Diwali Morning) अंगावर काटा आणणारी आरे कॉलनीत घडली. एका 16 महिन्यांच्या चिमुरडीवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात चिमुरडीचा दुर्दैवी अंत झाला आहे. आरे कॉलनीच्या युनिट नं. 15 इथं घडलेल्या या हृदयद्रावक घटनेनं हळहळ व्यक्त केली जातेय. दिवाळीच्या दिवशी आईच्या मागे मागे जात असतेवेळी या चिमुरडीवर बिबट्याने हल्ला (Leopard attack) चढवला. त्यात गंभीर जखमी झालेल्या चिमुरडीचा दुर्दैवा अंत झालाय. या घटनेमुळे आरे कॉलनीत पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पसरली आहे.

थरारक घटनाक्रम

मृत्यू झालेल्या दीड वर्षांच्या चिमुरडीचं नाव इतिका लोट असं आहे. इतिकाची आई दिवाळीनिमित्त दिवे लावण्यासाठी घराबाहेर पडली होती. घराशेजारीच असलेल्या 10 पावलं दूर असलेल्या एका मंदिरात इतिकाची आई निघाली. तिच्या मागेमागे इतिकाही येत होती.

सकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने इतिकावर हल्ला केला. आपल्या जबड्यात इतिकाला पकडून बिबट्या जंगलात पसार झाला. ही बाब इतिकाच्या आईने पाहिली आणि तिने एकच आरडाओरडा केला.

हे सुद्धा वाचा

इतिकाच्या आईने आरडाओरडा केल्यामुळे मदतीसाठी शेजारी लगचेच जमले. त्यांनी इतिकाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केला. सकाळी साडे सहा वाजण्याच्या दरम्यान, इतिका गंभीर जखमी अवस्थेत जंगलात आढळून आली. यावेळी बिबट्याही 500 मीटर अंतरावरच होता, अशी माहिती इतिकाच्या काकांनी दिलीय.

मृत्यूशी झुंज अपयशी

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, इतिकाला तातडीने मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे काही काळ तिची मृत्यूशी झुंज सुरु होती. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यानंतर इतिकाच्या आईवडिलांनी केलेला आक्रोशही काळीज पिळवटून टाकणारा होता. प्रचंड रक्तस्त्राव आणि गंभीर जखमांमुळे तिचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर आलीय.

2017 नंतर आरे कॉलनी बिबट्याच्या हल्ल्यात माणसाचा मृत्यू झाल्याचंही सांगितलं जातंय. याआधी 2017 साली फिल्म सिटीत एका तरुणाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. दरम्यान, बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी आता जोर धरतेय. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले असल्याचं सांगितलं गेलंय. तसंच लवकरच बिबट्याला जेरबंद करु, असंही ते म्हणालेत.

वाढत्या हल्ल्यांची भीती

दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला देखील हिमांशू यादव नावाच्या एका मुलावर आरे कॉलनीत बिबट्याने हल्ला केला होता. पण सुदैवानं या हल्ल्यातून हिमांशू बचावला होता. पण त्याला जखम झाली होती. मात्र आता चिमुरडी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्यानं पुन्हा एकदा आरे कॉलनीत बिबट्याची दहशत वाढलीय.

Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.