मुंब्र्यात भर रस्त्यात राडा, पोलिसांना आधी धक्काबुक्की, नंतर आरोपीने कोयता काढला

पोलीस अटक करायला गेले तेव्हा त्याने बराच वेळ पोलिसांशी हुज्जत घातली. एवढेच नाही तर त्याचे नातेवाईक देखील पोलिसांशी हुज्जत घालत होते (Accused attack on Police in Mumbra).

मुंब्र्यात भर रस्त्यात राडा, पोलिसांना आधी धक्काबुक्की, नंतर आरोपीने कोयता काढला
मुंब्र्यात भयानक थरार, पोलीस पकडायला गेले, आरोपीने कोयता काढला आणि.........
Follow us
| Updated on: Jun 27, 2021 | 7:04 PM

ठाणे : ठाण्यातील मुंब्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक धक्कादायक घटना घडली. आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसांवरच चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न एका आरोपीने केला. या आरोपीचं नाव बद्रुद्दिन असं आहे. त्याने अतिक्रमण तोडायला गेलेल्या ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कारवाईपासून रोखले होते. त्याने महापालिकेला अनधिकृत बांधकामांवर कारवाई करू दिली नाही. त्यामुळे त्याच्याविरोधात मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला (Accused attack on Police in Mumbra).

आरोपींचा पोलिसांवर हल्ला

यानंतर मुंब्रा पोलीस स्टेशनचे पोलीस बद्रुद्दिन याला पकडायला गेले. पोलीस अटक करायला गेले तेव्हा त्याने बराच वेळ पोलिसांशी हुज्जत घातली. एवढेच नाही तर त्याचे नातेवाईक देखील पोलिसांशी हुज्जत घालत होते. बघताबघता बद्रुद्दिन याने बाजूच्या एका मटन शॉपमधून धारदार चाकू घेतला आणि तो पोलिसांवर धावून गेला. त्याचबरोबर मी स्वतःलाच संपवून टाकेल, अशी भीती पोलिसांना देऊ लागला (Accused attack on Police in Mumbra).

घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद

या सर्व घटनेचा व्हिडीओ एका नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. संबंधित व्हिडीओत तो पोलिसांशी कसा हुज्जत घालतो हे स्पष्टपणे दिसत आहे. पोलिसांना चाकूचा धाक दाखवून बद्रुद्दिन घटनास्थळावरून फरार झाला आहे. त्याच्यावर मुंब्रा पोलिसांच्या कामात अडथळा आणणे म्हणजेच सरकारी कामात अडथळा आणणे या अंतर्गत कलम 353 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंब्र्यात कायदा-सुव्यवस्थेचा फज्जा

बद्रुद्दिन याचा शोध मुंब्रा पोलीस घेत असून बद्रुद्दिनवर आधी  देखील गुन्हे दाखल आहेत का? किंवा त्याने काही अनधिकृत बांधकाम केले आहे का? याचा तपास मुंब्रा पोलीस करत आहेत. या घटनेमुळे मुंब्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे. अशा पद्धतीने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर आणि पोलिसांवर हल्ला करणे, दहशत माजवणे, त्यांना कारवाईपासून रोखणे एकंदरच कायदा-सुव्यवस्थेचा फज्जा उडवणे हा सगळा प्रकार मुंब्रात सर्रासपणे घडत आहे. त्यामुळे मुंब्र्यात कायदा-सुव्यवस्था आहे का? असा प्रश्न देखील या घटनेमुळे पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

हेही वाचा :

डोक्यावर, अंगावर जखमा, ट्रान्सफॉरमरच्या बाजूला मृतदेह, विजेचा झटका की हत्या? गावात खळबळ

शिवसेना शहरप्रमुखाच्या हत्येचा अवघ्या काही तासात उलगडा, निघृणपणे खून करणाऱ्या चौघांना बेड्या

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.