Aditya Pancholi : बलात्कराचा गुन्हा रद्द करण्यासाठी आदित्य पांचोलीची मुंबई हायकोर्टात धाव, पोलिसांना उत्तर दाखल करण्याचे कोर्टाचे निर्देश

| Updated on: Aug 23, 2022 | 7:53 PM

वर्ष 2019 मध्ये एका अभिनेत्री तर्फे करण्यात आलेल्या बलात्काराच्या या कथित आरोप प्रकरणात मुंबई पोलिसांनी आदित्य पांचोलीच्या विरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

Aditya Pancholi : बलात्कराचा गुन्हा रद्द करण्यासाठी आदित्य पांचोलीची मुंबई हायकोर्टात धाव, पोलिसांना उत्तर दाखल करण्याचे कोर्टाचे निर्देश
बलात्कराचा गुन्हा रद्द करण्यासाठी आदित्य पांचोलीची मुंबई हायकोर्टात धाव
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : अभिनेता आदित्य पांचोली (Aditya Pancholi)ने आपल्या विरोधात दाखल केलेला बलात्काराचा गुन्हा (Rape Case) रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टा (High Court)त धाव घेतली आहे. पांचोलीने यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, या याचिकेवर आज सुनावणी झाली. सुनावणीनंतर मुंबई हायकोर्टाने या याचिकेवर मुंबई पोलिसांना नोटीस जारी करत त्यांना आपले उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. आदित्य पांचोलीच्या याचिकेवर मंगळवारी मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं मुंबई पोलिसांना नोटीस बजावून सदर याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर या प्रकरणाची सुनावणी सप्टेंबर महिन्यापर्यंत तहकूब केली आहे.

बलात्काराच्या कथित आरोप प्रकरणात पांचोलीविरोधात वर्सोवा पोलिसात गुन्हा

वर्ष 2019 मध्ये एका अभिनेत्री तर्फे करण्यात आलेल्या बलात्काराच्या या कथित आरोप प्रकरणात मुंबई पोलिसांनी आदित्य पांचोलीच्या विरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. संबंधित अभिनेत्रीने केलेल्या आरोपांनुसार आदित्य पांचोलीने वर्ष 2004 ते 2006 दरम्यान तिच्या करियरच्या सुरूवातीच्या काळात तिला नशेच्या आहारी ढकलत वारंवार तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. अभिनेत्रीने तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई पोलिसांनी तेव्हा हा गुन्हा दाखल केला होता. मात्र अद्याप या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही .

गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसंदर्भात पांचोलीची हायकोर्टात धाव

मागील जवळपास तीन वर्षांत पोलिसांनी या प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. याचाच अर्थ असा की, पोलिसांना या प्रकरणात ठोस काहीही आढळून आलेलं नाही. त्यामुळे आदित्य सतत कारवाईच्या सावटाखाली आहे. ही भिती दूर करण्यासाठी आपण सदर गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी याचिका दाखल करत असल्याचं अभिनेता आदित्य पांचोलीच्या वतीनं त्याचे वकील अभिनव चंद्रचूड यांनी कोर्टाला सांगितलं.

हे सुद्धा वाचा

अॅड. अभिनव चंद्रचूड यांनी असंही सांगितलं की, याप्रकरणी आता पोलिसांतर्फे बी समरी रिपोर्ट दाखल करण्याची वेळ आली आहे. म्हणून या संदर्भात दखल घेत मुंबई हायकोर्टातर्फे मुंबई पोलिसांना नोटीस बजावण्यात आली असून, सदर याचिकेवर पोलिसांनी आपले उत्तर दाखल करावे, असा आदेश देण्यात आलं आहे. (Aditya Pancholis petition in Bombay High Court to quash the rape case)