अंबरनाथमध्ये भरधाव अर्टिगा झाडाला धडकली! कारमधील चौघांचं काय झालं?

भीषण अपघातामध्ये अर्टिका कार झाडाला धडकून उलटली!

अंबरनाथमध्ये भरधाव अर्टिगा झाडाला धडकली! कारमधील चौघांचं काय झालं?
अंबरनाथमध्ये भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 15, 2022 | 10:11 AM

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये (Ambernath Accident News) सोमवारी रात्री एका अर्टिगा कारचा भीषण अपघात (Maharashtra Road Accident News) झाला. या अपघातात भरधाव अर्टिगा (Maruti Suzuki Ertiga) आधी एका झोपडीला आणि त्यानंतर झाडाला धडकली. त्यानंतर कार थेट रस्त्यावर पलटी झाली. यावेळी अर्टिगा कारमध्ये चौघेजण होते. त्यातील दोघे जण गंभीररीत्या जखमी झालेत. तर अन्य दोन जणही जखमी झालेत. त्यांना किरकोळ स्वरुपाचा मार लागलाय. या अपघातामुळे अतिवेग जीवावर बेतू शकतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.

अंबरनाथ एमआयडीसीतील सुदामा हॉटेलच्या जवळ मध्यरात्रीच्या सुमारास अर्टिगा कार अपघातग्रस्त झाली. MH 05 EJ 1835 क्रमांकाची एक एर्टीगा कार भरधाव वेगात बदलापूरहून अंबरनाथकडे येत होती.

मात्र सुदामा हॉटेलजवळ येताच या कारने आधी स्ट्रीट लाईटच्या पोलला, नंतर एका झाडं विक्रेत्याच्या झोपडीला आणि मग एका मोठ्या झाडाला धडक दिली आणि ही कार थेट पलटी झाली.

हे सुद्धा वाचा

यामध्ये कारमधील चौघांपैकी दोघे किरकोळ जखमी, तर दोघे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळतेय. या सर्वांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून हा अपघात नेमका कशामुळे घडला? तसंच अपघातावेळी चालकानं मद्यपान केलं होतं का? या सगळ्या गोष्टींचा पोलीस तपास करतायत.

या अपघातात कारचं प्रचंड मोठं नुकसान झालंय. कारच्या समोरच्या बाजूला अपघातात जबर मार बसला. तर कार पलटी झाल्यानं कारच्या आतल्या बाजुलाही जबर फटका बसला. तसंच अर्टिगा कारची समोरची कारही फुटली होती. या अपघाताची पोलिसांनी नोंद करुन घेतली आहे.

अनेकदा भगधाव वेगानं वाहनं चालवून अपघात झाल्याचं घटना वारंवार समोर येत आहेत. मात्र तरिही वाहन चालकांना वेगावर ताबा ठेवता येत नसल्याचं दिसून आलंय. या वाढत्या अपघातांनी रस्ते अपघातांचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.