मुंबई : मोबाईल चार्ज (Mobile Charge) करण्यासाठी कार सुरु केली, मात्र ती कार पुढे जाऊन लागली आणि अनियंत्रित (Uncontrol) झाली. अनियंत्रित झाल्याने कारने रिक्षा आणि पादचाऱ्यांना धडक (Hit) दिली. यामध्ये 7 जण जखमी (Injury) झाल्याची घटना बुधवारी दुपारी घाटकोपरमध्ये घडली आहे. एक महिला, तीन पुरुष, एक मूल आणि दोन किशोर अशा सातही जखमींना पोलिसांनी जवळच्या नागरी संचालित राजावाडी रुग्णालयात दाखल केले. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
राजेंद्र प्रसाद बिंदवे, सपना संगारे, आदित्य संगारे, वैष्णवी काळे, जयराम यादव, श्रद्धा सुशविरकर, भरत शहा अशी जखमींची नावे आहेत. या अपघात प्रकरणी पंत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
घाटकोपरमधील पंत नगर परिसरात ओला कॅब उभी होती. कॅबचा चालक संतोष यादव याने कारच्या आत मोबाईल चार्ज करण्यासाठी त्याचा मित्र राजू यादव याला चावी दिली.
राजूने सुरु करताच कार चुकून पुढे जाऊ लागली. यावेळी राजूने ब्रेक लावून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र ब्रेकऐवजी चुकून कारचा वेग वाढला आणि कार अनियंत्रित झाली. अनियंत्रित कारने तीन रिक्षा आणि पादचाऱ्यांना धडक दिली. या धडकेत सात जण जखमी झाले.
“राजूने फोन चार्ज करण्यासाठी कार सुरू करण्याचा प्रयत्न केला असता ही अपघाताची घटना घडली. कार रिक्षा आणि पादचाऱ्यांना धडक देत 50 मीटर पुढे गेली. त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे,” असे पंत नगरचे वरिष्ठ निरीक्षक एस.रविदत्त सावंत यांनी सांगितले.