मुंबई : ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) त्यांच्या वक्तव्यांमुळे आरएसएस समर्थक ॲड. संतोष दुबे यांनी मुलुंड येथील दंडाधिकारी न्यायालयात अख्तर यांच्याविरोधात कलम 499 (मानहानी), 500 (बदनामी अंतर्गत शिक्षा) फौजदारी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे जावेद अख्तरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
आरएसएसची प्रतिष्ठा खराब करणे, नुकसान हेतूने, हेतुपुरस्सर बदनामीकारक काल्पनिक विधाने केल्या प्रकरणी जावेद अख्तरांवर फौजदारी तक्रार दाखल केली आहे.
जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली असून, त्याचे समर्थन करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे म्हटले होते. अख्तर यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले होते. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी जावेद अख्तर यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अख्तर यांनी अफगाणिस्तान येथे जाऊन तालिबानी अतिरेक्यांसोबत राहावे म्हणजे त्यांना या अतिरेकी संघटनेबद्दल बस्तुस्थिती लक्षात येईल, उसं प्रत्युत्तर बावनकुळे यांनी दिलं होतं.
नेमकं प्रकरण काय?
प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली होती. तसेच, त्याचे समर्थन करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे म्हटले होते. एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी संभाषण करताना अख्तर म्हणाले की, आरएसएस, विहिंप आणि बजरंग दल सारख्या संघटनांचेही तालिबान सारखेच उद्दिष्ट आहे. ते म्हणाले की, भारतीय संविधान त्याच्या ध्येयाच्या मार्गात येत आहे, परंतु जर संधी मिळाली तर ते या सीमा देखील ओलांडतील.
एनडीटीव्हीशी संभाषण करताना जावेद अख्तर, ज्यांनी अफगाणिस्तानातील तालिबानची सत्ता ताब्यात घेण्यास नाखूष असलेल्या भारतीय मुस्लिमांच्या एका वर्गावर टीका केली होती. ते म्हणाले की, राईट विंग जगात एक आहे. भारतातील अल्पसंख्यांकांच्या मॉब लिंचिंगच्या काही घटनांवर अख्तर म्हणाले, ‘पूर्ण तालिबान बनण्याची ही एक प्रकारची पूर्ण ड्रेस रिहर्सल आहे. ते तालिबानी युक्तीचा अवलंब करत आहेत. ते एकच लोक आहेत, फक्त नाव वेगळे आहे. भारतीय राज्यघटना त्यांचे ध्येय आणि त्यांच्यामध्ये येत आहे, परंतु जर संधी दिली तर ते ही सीमा ओलांडतील.’
आरएसएस आणि तालिबानमध्ये फरक कुठे आहे?
जावेद अख्तर म्हणाले, ‘मला वाटते जे आरएसएस, विहिंप, बजरंग दल यासारख्या संघटनांना समर्थन देतात, त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तालिबान अर्थातच मध्ययुगीन मानसिकता आहेत, यात शंका नाही, ते रानटी आहेत पण तुम्ही समर्थन देत असलेल्यांपेक्षा ते वेगळे कुठे आहेत? त्यांची बाजू मजबूत होत आहे आणि ते त्यांच्या ध्येयाकडे वाटचाल करत आहेत. त्यांची मानसिकता सारखीच आहे.’
भारतातील मुठभर मुस्लिम तालिबानचे चाहते
अफगाणिस्तानात तालिबानी राजवटीच्या आगमनानंतर भारतीय मुस्लिमांच्या एका वर्गाने व्यक्त केलेल्या आनंद आणि इस्तकबालावर जावेद अख्तर म्हणाले की, अशा लोकांची संख्या खूप कमी आहे. ते म्हणाले की हे फ्रिंज आहेत, बहुतेक भारतीय मुस्लिम अशा वक्तव्याने हैराण झाले आहेत.
‘त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना आत्मनिरीक्षणाची गरज’, गीतकार जावेद अख्तरांनी केली आरएसएसची तुलना तालिबानशी!#JavedAkhtar | #Taliban | #RSShttps://t.co/Cxw3LRV1C0
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 4, 2021
संबंधित बातम्या :
‘जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तानात जाऊन अतिरेक्यांसोबत राहावं’, चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात
मग तालिबानमध्ये जा, केंद्रीय मंत्री कपिल पाटलांचा जावेद अख्तर यांना अजब सल्ला