Mumbai Crime : मुंबईत अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई, 266 किलो गांजा जप्त

| Updated on: Aug 10, 2022 | 8:38 PM

आरोपींकडून 66 लाख 50 हजार रुपये किमतीचा 266 गांजा आणि 16 लाख रुपये किमतीच्या दोन मारुती सुझुकी गाड्या, असा एकूण 82 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Mumbai Crime : मुंबईत अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई, 266 किलो गांजा जप्त
मुंबईत अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : अंमली पदार्थ विरोधी पथकाने आज भांडुपमध्ये कारवाई करत 60 लाख 50 हजार किमतीचा 266 किलो गांजा (Ganja) जप्त केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे युनिटने 9 ऑगस्ट रोजी ही कारवाई केली. याप्रकरणी दोन आरोपींना अटक (Arrest) केले असून, आरोपींकडून 16 लाख रुपये किमतीच्या दोन गाड्याही जप्त (Seized) करण्यात आला आहे. आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे. आरोपींनी हा गांजा कुठून आणला ? मालाची डिलिव्हरी कुणाकडे करणार होते ? याबाबत पोलीस तपास करत आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी हे गांजा पुरवठादार असून ते मुंबई बाहेरुन मोठ्या प्रमाणात गांजा हा अंमली पदार्थ सराईतपणे रात्रीचा प्रवास करुन घेऊन येतात. तसेच ते मुंबई शहर आणि उपनगर परिसरात गांज्या विक्रेत्यांना गांजा विक्री करतात.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला

भांडुप परिसरात गांजा घेऊन काही व्यक्ती येणार असल्याची गोपनीय माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीनुसार पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गायकवाड, सपोनि सुरेश भोये, सपोनि श्रीकांत कारकर आणि पोलीस पथकाने भांडुप ऐरोली जंक्शनजवळ सापळा रचला. यावेळी दोन संशयित कार येताना पोलिसांना दिसल्या. पोलिसांनी या कार अडवून तपासणी केली असता कारमध्ये गांजा सापडला. पोलिसांनी हा गांजा जप्त केला असून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये गांजा अंमली लपवण्यासाठी छुप्या पद्धतीची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. आरोपींकडून 66 लाख 50 हजार रुपये किमतीचा 266 गांजा आणि 16 लाख रुपये किमतीच्या दोन मारुती सुझुकी गाड्या, असा एकूण 82 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. (Anti-narcotics squads big operation in Mumbai, 266 kg of ganja seized)

हे सुद्धा वाचा