मनसुख हिरेनच्या हत्येसाठी 45 लाखांची सुपारी, NIA चा विशेष कोर्टात दावा

अँटिलिया स्फोटक प्रकरणात मनसुख हिरेन महत्त्वाचा साक्षीदार असल्यामुळे त्याच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे. अटक झालेले आरोपी अत्यंत खतरनाक असल्याचं एनआयएचे वकील सुनील गोन्साल्विस यांनी सांगितलं.

मनसुख हिरेनच्या हत्येसाठी 45 लाखांची सुपारी, NIA चा विशेष कोर्टात दावा
Mansukh Hiren
Follow us
| Updated on: Aug 04, 2021 | 8:50 AM

मुंबई : अँटिलिया स्फोटक प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाण्याचा व्यावसायिक मनसुख हिरेन (Mansukh Hiren) याची हत्या करण्यासाठी तब्बल 45 लाख रुपयांची सुपारी दिली गेली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएतर्फे मंगळवारी विशेष न्यायालयात ही माहिती देण्यात आली. आरोपपत्र दाखल करण्यासाठी अतिरिक्त 30 दिवसांची मागणी तपास यंत्रणेने केली.

मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपींनी हत्येसाठी 45 लाखांची सुपारी दिली होती. अँटिलिया स्फोटक प्रकरणात मनसुख हिरेन महत्त्वाचा साक्षीदार असल्यामुळे त्याच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक झालेले आरोपी अत्यंत खतरनाक असल्याचं एनआयएचे वकील सुनील गोन्साल्विस यांनी सांगितलं. 4 ते 5 साक्षीदारांना धमकी दिली गेली असल्याने ते पुढे येत नाहीत, कारण त्यांच्या जीवाला धोका आहे, असा दावाही वकिलांनी केला.

NIA चा दावा काय?

“मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करताना सचिन वाझे यांच्यासोबत सतीश, मनिष आणि प्रदीप शर्मा यांचा सहभाग स्पष्ट झाला. सतीश आणि मनिष यांनी मनसुख हिरेनची हत्या केल्याची कबुली दिली. सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या आदेशानेच त्यांनी मनसुख हिरेनची हत्या केली. हत्येनंतर दोघांनी प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांच्याशी संपर्क साधला होता. या हत्येसाठी दोघा आरोपींना रोख रक्कम देण्यात आली होती” असा दावा एनआयएच्या वकिलांनी जून महिन्यात केला होता.

हिरेनच्या हत्येनंतर आरोपी शर्मांच्या संपर्कात?

“सतीश, मनीष, रियाझ काझी, सचिन वाझे यांचा मनसुख हिरेन हत्येत सहभाग होता. सोबत संतोष शेलार आणि आनंद जाधव हेही होते. सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांनी कट रचून पुरावे नष्ट केले. हिरेनच्या हत्येनंतर सर्व आरोपी शर्मांच्या संपर्कात होते. मोठ्या प्रमाणात त्यांच्याजवळून पैसेही जप्त केले आहेत. प्रदीप शर्मा हे निवृत्त आहेत. त्यांच्या घरातून एक रिव्हॉल्वर मिळाली आहे. ज्याच्या लायसन्सची मुदत संपलेली आहे” असं वकिलांनी कोर्टात सांगितलं होतं.

संबंधित बातम्या :

वाझे आणि प्रदीप शर्मांच्या सांगण्यावरुन मनीष आणि सतीशकडून मनसुख हिरेन यांची हत्या, NIA चा दावा

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.