Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashwini Bidre Murder : अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी मोठी अपडेट! हत्याकांडांत वापरलेल्या चाकूबद्दल मोठा खुलासा

Ashwini Bidre Latest News : 11 एप्रिल 2016 रोजी अश्विनी बिद्रे यांची हत्या करण्यात आली होती.

Ashwini Bidre Murder : अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी मोठी अपडेट! हत्याकांडांत वापरलेल्या चाकूबद्दल मोठा खुलासा
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरण...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 8:14 AM

नवी मुंबई : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याप्रकरण (Ashwini Bidre Murder Case) आता न्यायलयात पोहोचलंय. अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणाचं गूढ कधी उलगडणार याकडे राज्यातील पोलीस दलासोबत सगळ्यांचंच लक्ष लागलंय. अशातच अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणात वापरण्यात आलेल्या शस्त्राबद्दल मोठा खुलासा करण्यात आलाय. हा चाकू ठाण्यातून (Thane News) खरेदी करण्यात आला होता. शुक्रवारी पनवेल न्यायालयात याप्रकरणी महत्त्वाची साक्ष झाली. त्या दरम्यान, महत्त्वपूर्ण बाबींचा उलगडा झाला आहे. अश्विनी बिद्रे यांच्या हत्येच्या पाच दिवस आधी चाकूची खरेदी करण्यात आली आहे. हा चाकू मुख्य आरोप अभय कुरुंदकर (Abhay Kurundkar News) याला एका पोलीस हवालदाराने आणून दिला होता. या पोलीस हवालदाराचं नाव विजय सोनावणे आहे. विशेष म्हणजे ठाणे शहरातील दादोजी कोंडदेव स्टेडियमजवळ असलेल्या मच्छीमार्केट परिसरात असलेल्या एका दुकानातून या चाकूची खरेदी करण्यात आली होती. त्यानंतर त्याच दिवशी नवघर पोलीस ठाण्याच्या समोर उभ्या असलेल्या कुरुंदकर यांच्या गाडीत विजय सोनावणे यांनी हा चाकू ठेवला होता. सोनावणे यांच्या हालचालींचा तयार करण्यात आलेल्या गुगल मॅपवर शुक्रवारी न्यायलायत सायबर तज्ज्ञ रोशन बंगेरा यांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब करण्यात आलं.

5 वर्ष जुनं हत्याकांड

11 एप्रिल 2016 रोजी अश्विनी बिद्रे यांची हत्या करण्यात आली होती. त्याआधी पाच दिवस म्हणजे 6 एपरिल 2016 रोजी पोलीस हवालदार विजय सोनावणे यांनी मुख्य आरोपीला चाकू आणून दिलेला. विजय सोनावणेंनी हा चाकू मुख्य आरोपी अभय कुरुंदकर यांच्या गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवला. हे सोनावणे यांच्या लोकेशनवरुन स्पष्ट झालंय. रोशन बंगेरा यांच्या उपस्थितीत सोनावणेंच्या दिवसभराच्या हालचालींचा गुगल मॅप तयार करण्यात आला. न्यायालयात हाच मॅप सादर करण्यात आला. शुक्रवारी पनवेल कोर्टात इनकॅमेरा ही सुनावणी पार पडली. यावेळी बंगेरा यांची साक्ष नोंदवण्यात आली. 8 जुलैपासून बंगेरा यांची साक्ष नोंदवण्यात सुरुवात करण्यात आली होती.

न्यायालयात काय घडलं?

अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाची सुनावणी सध्या पनवलेच्या अतिरीक्त सत्र न्यायधीश के जी पढेलवार यांच्या न्यायालयात सुरु आहे. दरम्यान, या सुनावणीवेळी अचानक बंगेरा यांची तब्बेत बिघल्यानं त्यांची साक्ष आता 29 जुलै रोजी पार पडणार आहे. या सुनावणीवेळी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत, सहय्यक पोलीस निरीक्षक संगीत अल्फान्सो, अश्विनी यांचे पती राजू गोरेही उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, सायबर संगणक तज्ज्ञ रोशन बंगेर यांनी मुख्य आरोपी अभय कुरुंदकर यांच्या मोबाईल फोनमधून अनेक फोटो रिकव्हर केले आहे. त्यापैकी 32 फोटोही न्यायालयात सादर करण्यात आले. तर आणखी 50 फोटोही लवकर न्यायालयात सादर केले जाणार आहेत.

काय आहे अश्विनी बिद्रे हत्याप्रकरण?

अश्विनी बिद्रे 2000 सालापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या. २००५ साली कोल्हापुरातील त्यांच्याच गावातील गोरे यांच्याशी त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर एकाच वर्षात अश्विनी यांना पोलीस उपनिरीक्षक पद मिळालं. पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांचं पोस्टींग आधी पुणे आणि मग सांगलीमध्ये करण्यात आलेलं होतं. यादरम्यान, अश्विनी यांची ओळख वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्याशी झाली. त्यानंतर त्यांच्याशी जवळीक वाढली.

2013 साली अश्विनी यांचं प्रमोशन झालं आणि त्यांची रत्नागिरीत बदली करण्यात आली. यादरम्यान, कुरुंदकर अश्विनी यांना भेटण्यासाठी वारंवार रत्नागिरीत जात होते. हे सगळं प्रकरण अश्विनी यांचे पती आणि त्यांच्या वडिलांना समजलं. कालांतराने अश्विनी आणि अभ्य कुरुंदकर यांच्यात वाद व्हायला सुरुवात झाली. कुरुंदकर यांच्याकडून अश्विनी यांना गायब करण्याच्या धमक्या दिल्या जाऊ लागल्या. जीवे मारण्याचीही धमकी अश्विनी यांच्या कुटुंबीयांना दिली गेली.

2015 साली अश्विनी बिद्रेंची बदली नवी मुंबईच्या कळंबोलीत करण्यात आली होती. 15 एप्रिल 2015 पासून अश्विनी बिद्रे बेपत्त होत्या. पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरांनी अश्विनी यांना बेपत्ता केल्याचा आरोपा अश्विनी यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आलेला होता. दरम्यान, अश्विनी बिद्रे यांची हत्या करुन त्यांच्या शरीराचे तुकडे वाशी खाडीत टाकल्याचा आरोप कऱण्यात आला होता. याप्रकरणी मुख्य आरोपी अभय कुरुंदकर यांच्या अन्य काही जणांनाही अटक करण्यात आली आहे.

शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?
शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?.
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू.
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर.
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले.
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?.
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?.
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं.
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे.
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान.
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले...
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले....