Badlapur CCTV: दिवसाढवळ्या दुकानात शिरला, दुकानाचील ड्रॉव्हरमधून 1 लाख 20 हजार चोरुन पोबारा

Badlapur Crime: बदलापूर पूर्वेच्या शिरगाव आपटेवाडी परिसरात जीए ग्लास वर्क्स नावाचं काचेचं दुकान आहे. या दुकानात 16 एप्रिल रोजी संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास दोन जण आले.

Badlapur CCTV: दिवसाढवळ्या दुकानात शिरला, दुकानाचील ड्रॉव्हरमधून 1 लाख 20 हजार चोरुन पोबारा
चोरीची घटना कॅमेऱ्यात कैदImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 7:14 AM

बदलापूर : दिवसाढवळ्या झालेल्या चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Video) कैद झाली आहे. बदलापुरातील (Badlapur Crime) एका दुकनात घुसून ही चोरी करण्यात आली आहे. यावेळी चोरट्यानं दिवसाढवळ्या दुकानात प्रवेश केला. दुकानात कुणी नाही, हे पाहून डाव साधला. दुकान्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले एक लाख 20 हजार रुपये चोरट्यानं लांबवले आहेत. ही संपूर्ण चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चोरी झाल्याचं लक्षात येताच दुकानदारानं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या फुटेजच्या मदतीनं चोरट्याचा शोध घेतला जातोय. बदलापूरच्या आपटेवाडीत (Aptewadi in Badlapur) चोरीची ही घटना घडली. सुरुवातील चोरटा दुकानाच्या बाहे हाताची घडी घालून उभा असल्याचं दिसतंय. त्यानंतर दुकानात प्रवेश करत या चोरट्यानं ड्रॉव्हरचं लॉक फोडलं आणि ड्रॉव्हरमध्ये ठेवलेली रोकड लंपसा केली. यावेळी या चोरट्याच्या चेहऱ्यावर मास्क दिसल्यानं त्याचा चेहरा नीट सीसीटीव्हीमध्ये दिसू शकलेला नाही.

ग्लास वर्कच्या दुकानातील घटना

बदलापूर पूर्वेच्या शिरगाव आपटेवाडी परिसरात जीए ग्लास वर्क्स नावाचं काचेचं दुकान आहे. या दुकानात 16 एप्रिल रोजी संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास दोन जण आले. संध्याकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास चोरीची ही घटना घडली. यापैकी एक जण हा तिथल्या कामगाराशी बोलत थांबला आणि त्याचं लक्ष चुकवून दुकानात घुसला.

दुकानात असलेल्या टेबलचा ड्रॉव्हर त्याने स्क्रू-ड्रायव्हरने उचकटून काढला. ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले 1 लाख 20 हजार रुपये घेऊन चोरटा नंतर पसार झाला. या ड्रॉव्हरमध्ये दुकानमालक अकील मोहम्मद खान यांनी एका बिल्डरकडून ऑर्डरचे घेतलेले 1 लाख 20 हजार रुपये ठेवले होते. त्यावर चोरट्यानं डल्ला मारलाय.

ही सगळी घटना दुकानातल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालीये. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध घेतायत.

पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

Delhi : जहांगीरपुरी हिंसा प्रकरण : हिसेंच्या एक दिवस आधी काठ्या जमा करताना दिसले हल्लेखोर, CCTV त कैद

साताऱ्यात हनीट्रॅपद्वारे तरुणांना जाळ्यात अडकवून खंडणी मागणाऱ्या जोडप्याचा पर्दाफाश

Chandrapur Tiger Attack : चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात 24 तासात दोघांचा मृत्यू

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.