Badlapur Crime : दारु प्यायला, बायकोशी भांडला, मग तिच्यात डोक्यात हातोडा हाणला! बदलापूरमधील धक्कादायक घटना

Badlapur Crime News : बदलापूरमधून खरवाई इथं ही धक्क्दायक घटना घडली.

Badlapur Crime : दारु प्यायला, बायकोशी भांडला, मग तिच्यात डोक्यात हातोडा हाणला! बदलापूरमधील धक्कादायक घटना
बदलापुरात खळबळImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 10:22 AM

बदलापूर : बदलापूरमधून (Badlapur Crime News) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एकानं आपल्या पत्नीच्या डोक्यात थेट हातोड्यानं (Husband Attacked wife) प्रहार केलाय. या पत्नी गंभीर जखमी झाली होती. डोक्यातच प्रहार केल्यानं तिच्या डोक्याला जबर मार बसला आणि रक्तस्त्राव झाला. यानंतर जखमी पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिच्यावर लगेचच उपचार करण्यात आल्यानं थोडक्यात मोठा अनर्थ टळला. आता तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून याप्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली. आरोपी पतीविरोधात पोलिसांनी (Badlapur Police News) गुन्हा नोंदवून घेत त्याला अटकदेखील केली आहे. सध्या बदलापूर पोलीस याप्रकरणी आरोपी पतीची कसून चौकशी करत असून पुढील कारवाई केली जातेय. दारुच्या नशेच पतीनं आपल्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुदैवानं यातून पत्नी थोडक्यात बचावली आहे.

नेमकं काय घडलं?

बदलापूरमधून खरवाई इथं ही धक्क्दायक घटना घडली. खरवाईच्या काथोडवाडी परिसरात एक इसम दारु पिऊन घरी आला. दारुच्या नशेत घरी आलेल्या या इसमाने आपल्या पत्नीसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. वाद विकोपाला जाऊन त्यानंतर पत्नीच्या डोक्यात हातोड्याने जोरदार प्रहार केला. यात पत्नी जखमी झाली. त्यामुळे तिला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी वेळीच उपचार केल्यानं पत्नील बालंबाल बचावली.

हे सुद्धा वाचा

आरोपी पतीला अटक

शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यातील आरोपी पतीचं नाव गोरख भोईर असं असून तो आपली पत्नी सवितासोबत काथोडवाडी झोपडपट्टीत वास्तव्यास होता. बायकोबर शुल्लक कारणावरुन वाद होऊन गोरखने सवितावर जीवघेणा हल्ला केला होता. यानंतर गोरखविरोधात पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली आहे. सध्या गोरखची बदलापूर पूर्व पोलिसांकडून कसून चौकशी केली जातेय.

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.