Mobile Theft | चोरीचा मामला, सासूसुनेचा गेम फसला! कल्याण रेल्वे स्थानकातून सासू-सुनेला अटक

चोरीच्या तक्रारींनंतर पोलिसांनी सीसीटीव्हीनं बारीक नजर ठेवली होती. त्यानंतर एका व्हिडीओत दोन महिला पर्स चोरी करुन पळ काढताना आढळून आल्या होत्या.

Mobile Theft | चोरीचा मामला, सासूसुनेचा गेम फसला! कल्याण रेल्वे स्थानकातून सासू-सुनेला अटक
महिला चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 6:49 PM

कल्याण : रेल्वे स्थानकात (Railway Station) किंवा धावत्या ट्रेनमध्ये चोरीच्या घटना कल्याणमध्ये (Kalyan) नेहमीच्याच झाल्या होत्या. मात्र चोऱ्या (Theft) करणाऱ्या एका जोडीचा भांडाफोड पोलिसांनी (Railway Police) केलाय. रेल्वे स्थानकात मोबाईलवर (Mobile) डोळा ठेवून चोऱ्या करणारी ही जोडी दुसऱ्या तिसऱ्या कुणाची नाही, तर चक्क सासूसुनेचीच असल्याचं उघड झालंय. या दोघींनीही कल्याणमधून अटक करण्यात आली असून रेल्वे क्राईम ब्रांचनं (Crime Branch) ही कारवाई केली आहे.

रेल्वे क्राईम ब्रांचची कारवाई

लाखोंची चोरी

उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या एक महिलेनं आपली पर्स चोरी झाल्याची तक्रार दिली होती. या पर्समध्ये ३ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने होते. तपोवन एक्स्प्रेसच्या गाडी पकडत असताना ही चोरी झाली होती. ११ डिसेंबरला चोरीच्या घटनेबाबत पोलिसांना तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी आपल्या तपासाची सूत्र हलवत कल्याणच्या प्लॅटफॉर्म नंबर चारवरील सीसीटीव्ही फुटेज तपासलं.

कसा लागला चोरांचा शोध?

चोरीच्या तक्रारींनंतर पोलिसांनी सीसीटीव्हीनं बारीक नजर ठेवली होती. त्यानंतर एका व्हिडीओत दोन महिला पर्स चोरी करुन पळ काढताना आढळून आल्या होत्या. या दोन्ही महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानं पोलिसांचं काम अधिकच सोपं झालं. पोलिसांनी या दोन्ही महिलांना सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. अखेर या दोघींनाही अटक करण्यात आली आहे.

अधिक तपास सुरु!

अटक कऱण्यात आलेल्या सासूचं नाव रेखा कांबळे असं असून सुनेचं नाव रोझा कांबळे असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आता या दोघींचीही कसून चौकशी केली जात असून त्यांनी अशा आणखी किती चोऱ्या केल्या आहेत, याचा पोलीस शोध घेत आहेत. इतरही अनेक चोऱ्यांमध्ये त्यांचा हात असण्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. आतापर्यंत पोलिसांनी या महिलांकडून ३ लाख रुपये किंमतीचे चोरलेले सोन्याचे दागिने तसंच इतर दोन गुन्ह्यांमधील १ लाख २५ हजार रुपयाचे दागिने अशी एकीण ४ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

इतर बातम्या –

Crime | तृतीयपंथीयांचा रास्तारोको! 24 तासांत दोघां तृतीयपंथीयांच्या हत्येमुळे जाळपोळ, तोडफोड

मुलींचे अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाची हत्या, पीडित तरुणींनीच काढला काटा

वर्दळीच्या ठिकाणी चाकूने भोसकून तरुणाची हत्या, आरोपी फरार; पोलिसांकडून तपास सुरु

Badshah Malik | देशातील सर्वात मोठा रक्तचंदन तस्कर जाळ्यात, बादशाह मलिक मुंबईत जेरबंद

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.