Mumbai : पप्पांसाठी चपात्या आणायला घरातून निघाला, पण जिवंत परतलाच नाही!

चपात्या सोडून आईने सगळं जेवणं केलं, चपात्यांसाठी मुलाला हॉटेलात पाठवलं आणि अनर्थ घडला

Mumbai : पप्पांसाठी चपात्या आणायला घरातून निघाला, पण जिवंत परतलाच नाही!
दुर्दैवी मृत्यूImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 22, 2022 | 10:36 AM

ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई : मुंबईतील शिवाजी नगर इथं एक काळीज पिळवटून (Heart Breaking Incident) टाकणारी घटना गुरुवारी घडली. एका 12 वर्षांच्या लहान मुलाला बेस्ट बसनं (Mumbai Best Bus Accident) चिरडलं. या अपघातात मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत मुलगा आपल्या वडिलांसाठी चपात्या आणायला हॉटेलमध्ये जात होता. त्यावेळी हा अपघात घडला. या अपघाताने आईवडिलांच्या मनावर मोठा आघात झालाय. ही दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास गोवंडी (Gowandi) इथं घडली. या अपघातप्रकरणी बेस्ट बस चालकाला अटक करण्यात आलीय.

हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या अपघातातील मृत मुलाचं नाव समीर इद्रीशी आहे. तो आपल्या आईवडिलांसह राहत होता. त्याला एक 14 वर्षांचा मोठा भाऊ आहे. तो कर्नाटकातील एका मदरशामध्ये शिक्षण घेतोय. समीरचे वडील रिक्षा चालक असून त्यांचं नाव रियाझ आहे. रियाझ यांच्या पत्नीनेच समीरला चपात्या आणण्यासाठी हॉटेलमध्ये पाठवलं होतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाझ यांची पत्नी घरी जेवण करत होती. तिने चपात्या सोडून संपूर्ण स्वयंपाक केला होता. चपात्या आणण्यासाठी समीरच्या आईने त्याला हॉटेलात पाठवलं होतं. 90 फिट रोडवर असलेल्या आशियाना हॉटेलातून समीर चपात्या घेऊन परतणार होता. पण हॉटेलात जाण्याआधीच त्याच्यावर काळानं घातला.

हे सुद्धा वाचा

पाहा लाईव्ह घडामोडी :

घरातून निघाल्यानंतर दहा मिनिटांनीच रियाझ यांना त्यांच्या मित्राने फोन करुन मुलाचा अपघात झाल्याचं सांगितलं. बस डेपोच्या गेट नंबर चार जवळ रियाझला बसने चिरडलं होतं. रफीक नगर इथं जाणाऱ्या बसने समीरला धडक दिली.

या धडकेत समीर दूरवर फेकला गेला. त्यानंतर तो बसखाली आला. अचानक समोर आल्यानं बस चालकाला काय घडलंही हे आधी कळलंच नाही. पण जेव्हा कुणीतरी बस खाली आलंय, हे लक्षात आलं, तोपर्यंत फार उशिर झाला होता.

31 वर्षीय गणेश गुंजाळ बस चालवत होते. या थरारक अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेतील 12 वर्षीय समीरल शताब्दी रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथे नेण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. अखेर डॉक्टरांनी समीरला मृत घोषित केलं.

समीरच्या डोक्याला जबर मार लागला होता. आता पोलिसांनी बस चालकाला अटक केली असून पुढील तपास केला जातोय. या घटनेनं शिवाजी नगर परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.

पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.