Bhiwandi Crime : बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना! सहावीतील मुलीचा अत्याचार करत खून, बापाला अटक

Bhiwandi Father killed daughter : अवघ्या दोन तासात आरोपी पित्याला बेड्या ठोकल्या.

Bhiwandi Crime : बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना! सहावीतील मुलीचा अत्याचार करत खून, बापाला अटक
संतापजनक घटना...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 16, 2022 | 10:18 AM

भिवंडी : वडील आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना भिवंडीतून (Bhiwandi Crime News) समोर आली आहे. जन्मदात्या पित्याने आपल्या दहा वर्षांच्या मुलीवर अमानुष अत्याचार केला. त्यानंतर तिची गळा आवळून हत्या (Bhiwnadi Murder) केली. याप्रकरणी पोलिसांनी नराधम बापाला अटक केली होती. तक्रारीनंतर अवघ्या दोन तासांच्या आत पोलिसांनी अटकेची कारवाई केली. अखेर या नराधम बापाला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. भिवंडीमध्ये ही खळबळजनक घटना घडली. भिवंडीच्या पद्मानगरमध्ये घडलेल्या या घटनेनं सगळेच हादरुन गेले आहेत. घरी कुणी नसल्याचं पाहून या माथेफिरु बापाने आपल्याच मुलीवर डाव (Father killed daughter) साधला. बेरोजगार आणि दारुच्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या या बापाच्या धक्कादायक कृ्त्याने संपूर्ण भिवंडीत संताप व्यक्त केला जातोय. या घटनेनं राज्यातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा रामभरोसेच असल्याचं अधोरेखित झालं आहे.

कळलं कसं?

कुठे काम नसलेला हा इसम बायकोच्या पैशांवरच गुजराण करत होता. त्याची बायको एका गोदामात काम करत होती. या दाम्पत्याला एक सहावीत शिकणारी मुलही होती. घरात कुणीच नसल्याचा फायदा घेत या दारुड्या बापाने आपल्या मुलीवप अत्याचार केला आणि त्यानंतर तिची गळा आवळून हत्या केली. यानंतर त्याने घरातून पळ काढला.

कामावरुन जेव्हा या पीडित मुलीची आई घरी परतली, तेव्हा हा खळबळजनक प्रकार समोर आला. महिलेनं आरडाओरडा केला. शेजाऱ्यांच्या मदतीने मुलीला रुग्णालयात नेलं. पण तिथं डॉक्टरांनी या मुलीला मृत घोषित केल्यानं सगळ्यांच मोठा धक्का बसला. याप्रकरणी अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ : मोठी राजकीय घडामोड

दोन तासांत अटक

त्यानंतर भिवंडी शहर पोलिसांनी याप्रकरणी तातडीनं कारवाई करत अवघ्या दोन तासात आरोपी पित्याला बेड्या ठोकल्या. त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. अखेर आरोपी पित्याला न्यायालयानं सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.