Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC च्या दोन चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा घोटाळा, पत्नीच्या नावे कंपनी बनवून कोट्यवधींची कंत्राटे मिळवली

मुंबई महापालिकेत चतुर्थश्रेणी शिपाई असलेल्या दोन कर्मचाऱ्यांनी आपापल्या पत्नींच्या नावे कंपन्या बनवून नियमबाह्यरित्या महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये कोट्यवधींची कंत्राटे मिळवली, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे (BMC class iv employees made company on their wife names and illegally gain contracts of covid center).

BMC च्या दोन चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा घोटाळा, पत्नीच्या नावे कंपनी बनवून कोट्यवधींची कंत्राटे मिळवली
mumbai municiple corporation
Follow us
| Updated on: Jul 08, 2021 | 8:26 PM

मुंबई : कोरोना काळात डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रचंड मेहनत केली. त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले ही गोष्ट खरी असली तरी कोरोना काळात काही ठिकाणी भ्रष्टाचार झाल्याचा प्रकारही समोर आला आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेत चतुर्थश्रेणी शिपाई असलेल्या दोन कर्मचाऱ्यांनी आपापल्या पत्नींच्या नावे कंपन्या बनवून नियमबाह्यरित्या महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये कोट्यवधींची कंत्राटे मिळवली, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे (BMC class iv employees made company on their wife names and illegally gain contracts of covid center).

आतापर्यंत किती रुपयांचे कंत्राटे मिळवली?

मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागात चतुर्थश्रेणी शिपाई असलेले अर्जून नराळे, आणि मेंटेनंन्स विभागातील शिपाईपदावरचे रत्नेश भोसले यांनी आपल्या पत्नींच्या नावे कंपनी सुरु केली. अर्जून नराळेची पत्नी अपर्णाच्या नावे असलेल्या श्री एंटरप्रायजेस या कंपनीने गेल्या दीड वर्षात 1 कोटी 11 लाख रुपयांची कामे मिळवली आहेत. तर रत्नेश भोसलेच्या पत्नी रिया भोसले याच्या आर आर एंटरप्रायजेस या कंपनीला 65 लाख रुपयांची कामे मिळाली आहेत (BMC class iv employees made company on their wife names and illegally gain contracts of covid center).

दोन कंपन्यांनी कोविड सेंटरमध्ये अनेक वस्तू पुरवल्या

मुंबई महापालिका अधिनियमानुसार पालिकेत नोकरीला असलेल्या व्यक्तीला किंवा त्याच्या जवळच्या नातेवाईकाला पालिकेची अशी कंत्राटे घेता येत नाहीत. पण या दोघांनी मात्र नियम धाब्यावर बसवत स्वत:च्या पत्नींच्या नावे कंपनी खोलून कोट्यवधींची कामे मिळवली. पालिकेच्या डी विभागात कोरोना काळात कुठलीही वस्तू लागली तरी त्या पुरवठा करण्याचे काम या दोन कंपन्यांनी केलंय. स्क्रू ड्रायव्हरपासून कॉम्प्यूटर पार्टपर्यंत आणि टेबलपासून भाड्याने गाड्या देण्यापर्यंत सर्व काही पुरवठा या दोन कंपन्यांनी केला आहे.

यात कोविड सेंटरमधील रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिमीटर, इलेक्ट्रीक केटल, स्टीमर या वस्तूंचा पुरवठा देखील केलाय. रत्नेश भोसले आधी डी विभागात होते. आता बांद्राला एच पश्चिम विभागात कार्यरत आहेत.

अधिकाऱ्यांच्या साटेलोटे असल्याशिवाय शक्य नाही

चतुर्थश्रेणीतील दोन कामगार एवढे मोठे धाडस अधिकाऱ्यांशी साटेलोटे असल्याशिवाय करणं शक्य नाही. कोरोना काळात मोठ्या प्रमाणात पालिकेच्या वॉर्ड स्तरावर खरेदी करण्यात आलेली आहे. या सर्व खरेदी व्यवहाराची चौकशी व्हावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

हेही वाचा : घरात एकाच खाटेवर रात्री सोबत झोपले, पहाटे उठल्यानंतर पती रक्ताच्या थारोळ्यात, मध्यरात्री काय घडलं? पत्नीला थांगपत्ताच नाही

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.