Salman Khan : अभिनेता सलमान खानने घेतली पोलीस आयुक्तांची भेट, जाणून घ्या काय आहे कारण ?

आपल्या सुरक्षेसंदर्भात अपडेट घेण्यासाठी आणि धमकीबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी सलमान खानने पोलीस आयुक्तांची भेट घेतली. सलमानला कशा प्रकारची धमकी मिळाली होती, याबाबत आयुक्तांनी माहिती जाणून घेतली.

Salman Khan : अभिनेता सलमान खानने घेतली पोलीस आयुक्तांची भेट, जाणून घ्या काय आहे कारण ?
सलमान खानच्या बॉडी डबलचा हृदयविकाराने मृत्यू
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 6:09 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याने मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर (Vivek Phansalkar) यांची आज भेट (Meet) घेतली. पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येनंतर सलमान खानला जीवे मारण्याची धमकी आली होती. सलमानचे वडिल सलीम खान यांना हे धमकीचे पत्र मिळाले होते. या धमकीनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. या धमकीनंतर सलमानने सुरक्षेच्या दृष्टीने शस्त्र परवाना मिळण्यासाठी अर्ज दिला होता. यासंदर्भात सलमान खानने पोलीस आयुक्त फणसळकर यांची भेट घेतल्याची माहिती मिळते.

आपल्या सुरक्षेसंदर्भात अपडेट घेण्यासाठी आणि धमकीबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी सलमान खानने पोलीस आयुक्तांची भेट घेतली. सलमानला कशा प्रकारची धमकी मिळाली होती, याबाबत आयुक्तांनी माहिती जाणून घेतली. तसेच सलमानला त्याच्या सुरक्षेबाबत माहिती दिली.

सलमान खानला दिलेल्या धमकीबाबत बिश्नोईची चौकशी

सलमान खानला धमकीचे पत्र मिळाल्यानंतर दिल्लीतील तुरुंगात कैद असलेल्या लॉरेन्स बिश्नोईची दिल्ली पोलिसांनी चौकशी केली. मात्र बिश्नोईने सलमानला धमकी दिल्याची बाब नाकारली आहे. आपल्या नावे कुणीतरी हे धमकीचे पत्र दिल्याचे बिश्नोईने पोलीस चौकशीत सांगितले. मात्र काही वर्षांपूर्वी सलमाने हरणाची शिकार केली होती. त्यामुळे त्याच्यावर नाराज झाल्याने आपण त्यावेळी आपण आपला सहकारी संपत नेहरा याला सलमानच्या हत्येची सुपारी दिल्याची कबुली त्याने दिली आहे. या कामासाठी 3-4 लाख रुपयाची स्पेशल आरके स्प्रिंग रायफलची ऑर्डरही दिली होती. मात्र त्याआधीच त्याला अटक झाली होती. काळे हरण शिकारीबाबत सलमान माफी मागत नाही तोपर्यंत बिश्नोई समाज त्याला माफ करणार नाही. सलमानने माफी मागितली नाही तर या केसबाबत कोर्टाचा निर्णय शेवटचा सलमानसाठी शेवटचा नसेल, असेही बिश्नोईने म्हटले होते. (Bollywood Actor Salman Khan met Mumbai Police Commissioner Vivek Phansalkar)

हे सुद्धा वाचा

मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.