Shakti Kapoor : घराच्या ताब्यासाठी शक्ती कपूर न्यायालयात, वाचा काय आहे नेमकं प्रकरण ?
शक्ती कपूर यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जुहू येथे शक्ती कपूर यांचे एक घर आहे. हे घर त्यांनी एका दाम्पत्याला भाड्याने दिले होते. संपत्तीवरुन पती-पत्नीमध्ये आपसात भांडण होत होते. यानंतर दोघेही विभक्त झाले आहेत. तरी देखील त्या घराचा ताबा त्यांच्याकडेच आहे. अनेक वेळा सांगून सुद्धा भाडोत्री दाम्पत्यांनी कपूर यांच्या भाड्याने घेतलेल्या घर खाली केले नाही.
मुंबई : सिनेमाच्या पडद्यावर खलनायकाच्या भूमिकेत दुसऱ्यांना नेहमीच अडचणीत आणणारे अभिनेता शक्ती कपूर (Shakti Kapoor) हे खाजगी जीवनात स्वतः सध्या अडचणीत आले आहेत. यामुळेच त्यांना मुंबई हायकोर्टाची पायरी चढावी लागली आहे. बॉलिवूड सिनेमात नेहमी खलनायकची भूमिका साकारणारे अभिनेता शक्ती कपूर हे आज मुंबई उच्च न्यायालया (Bombay High Court)त आले होते. शक्ती कपूर यांचे घर भाड्या (Rent)ने देण्यात आले होते. मात्र भाडेकरुंना अनेकदा सांगूनही ते घर सोडत नाहीत. यामुळेच शक्ती कपूर यांनी भाडोत्र्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे. याआधी कनिष्ठ न्यायालयाने शक्ती कपूर यांच्या बाजूने निर्णय दिला होता. या निर्णयाला भाडोत्र्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. याबाबत आज सुनावणी करण्यात आली.
अनेक वेळा सांगूनही भाडोत्री घर सोडत नाही
शक्ती कपूर यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जुहू येथे शक्ती कपूर यांचे एक घर आहे. हे घर त्यांनी एका दाम्पत्याला भाड्याने दिले होते. संपत्तीवरुन पती-पत्नीमध्ये आपसात भांडण होत होते. यानंतर दोघेही विभक्त झाले आहेत. तरी देखील त्या घराचा ताबा त्यांच्याकडेच आहे. अनेक वेळा सांगून सुद्धा भाडोत्री दाम्पत्यांनी कपूर यांच्या भाड्याने घेतलेल्या घर खाली केले नाही. या प्रकरणामध्ये खालच्या कोर्टाने अभिनेता शक्ती कपूर यांच्या बाजूने निर्णय दिला होता. तरी देखील भाडोत्री दाम्पत्याने त्यांचे घर खाली केले नाही. त्याचबरोबर भाडोत्री दाम्पत्याने खालच्या न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्या प्रकरणात सुनावणी होती म्हणूनच आज शक्ती कपूर हे मुंबई उच्च न्यायालयात आले होते. मात्र कोर्टाने शक्ती कपूर यांना पुढील तारीख दिली आहे. (Bollywood actor Shakti Kapoor in court to get possession of his rented house)