मुंबई : मुंबईतून (Mumbai News) एक मोठी बातमी समोर येतेय. मुंबईच्या पश्चिम उपनगर येथील बोरीवलीच्या (Boriwali) वझिरा नाका (Wazira Naka Boriwali) इथं एका इमारतीचा काही भाग कोसळला. 3 मजली इमारतीचा काही भाग कोसळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. धक्कादायक बाब म्हणजे इमारतची भाग कोसळल्यानंतरची थरकाप उडवणारी काही दृश्य समोर आली आहे. ANI वृत्त संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, तब्बल 4 ते 5 गाड्या या इमारतीच्या ढिगाऱ्यााखाली गाडल्या गेल्या. यात गाड्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, जीवितहानीचं अद्यापतरी कोणतंही वृत्त समोर आलेलं नाही.
वझिरा नाका इथं झालेल्या इमारतीचा भाग कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यामार्फक सध्या बचावकर्य केलं जातंय. ढिगाऱ्याखाली कुणीली अडकलेलं तर नाही ना, या दृष्टीने तपास केला जातो आहे.
Maharashtra | 4-5 vehicles were trapped underneath after a portion of a three-storey building collapsed in Wazira Naka area of Borivali of Mumbai. No injuries were reported pic.twitter.com/R822JhzC6F
— ANI (@ANI) October 28, 2022
समोर आलेल्या काही फोटोमध्ये काही गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. पार्क केलेल्या वाहनांवरच इमारतीचा भाग कोसळल्यानं एकच खळबळ उडाली होती. एक टेम्पो ट्रॅव्हलर, इनोव्हा आणि व्हॅगेनार कारसह इतरही काही वाहनं ढिगाऱ्याखाली अडकली गेल्याचं दिसून आलंय.
सध्या या ठिकणी ढिगारा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. परिसरात या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. नेमका या इमारतीचा भाग कशामुळे कोसळला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकेललं नाही.
पालिका अधिकाऱ्यांसह, पोलीस आणि इतर प्रशासकीय यंत्रणाही या ठिकाणी बचावकार्यासाठी दाखल झाली आहे. आता क्रेनच्या मदतीने ढिगारा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आलं आहे. या गाड्यांचा चक्काचूर झाल्याने गाडी मालकांना आर्थिक फटका बसलाय.