ठाकरे गटाला पुन्हा धक्का, माजी नगरसेवकाच्या घरी एसीबीचा छापा, अडचणी वाढणार?

शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक योगेश भोईर (Yogesh Bhoir) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण एसीबीने (ACB) भोईर यांच्या घरी छापा टाकला आहे.

ठाकरे गटाला पुन्हा धक्का, माजी नगरसेवकाच्या घरी एसीबीचा छापा, अडचणी वाढणार?
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 5:47 PM

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या पाठीमागे तपास यंत्रणांचा असणारा चौकशीचा ससेमिरा काही कमी होताना दिसत नाही. शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून सातत्याने ठाकरे गटाशी संबंधित अनपेक्षित अशा बातम्या समोर येत आहेत. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊते मध्यंतरी तब्बल 100 दिवस पेक्षा जास्त काळ जेलमध्ये होते. याशिवाय ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या पाठिमागे देखील चौकशीचा ससेमिरा लागली आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते योगेश भोईर यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आली आहे.

ठाकरे गटाचे योगेश भोईर यांच्याविरोधात एसीबीने गुन्हा दाखल केलाय. एसीबीची टीम भोईर यांच्या घरी छापेमारीसाठी पोहोचल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. योगेश भोईर हे माजी नगरसेवक आहेत. भोईर यांनी 85 लाख रुपयांपेक्षा जास्तची मालमत्ता जमवल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय. याप्रकरणी सध्या भोईर यांच्या घरी छापा सुरु आहे.

योगेश भोईर यांच्यावर ज्ञात मिळकतीच्या 441 टक्के अपसंपदा जमवल्याचा आरोप आहे. नगरसेवक पदाच्या कालावधीमध्ये ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक 85, 56, 562 म्हणजेच 449.13 टक्के अपसंपदा संपादित केल्याचा आरोप आहे.

योगेश भोईर यांच्यावर याआधी खंडणीचे आरोप

दरम्यान, काही दिवसांपूर्वी योगेश भोईर यांना पोलिसांनी अटक केल्याची देखील बातमी समोर आली होती. योगेश भोईर हे ठाकरे गटाचे मालाड, कांदिवली पूर्व येथील माजी नगरसेवक आहेत. तसेच ते मागाठाणेचे उपविभाग प्रममुख आहेत. त्यांनी तीन महिन्यांपूर्वी पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 11 च्या पथकाने खंडणीच्या आरोपांखाली अटक केली होती.

योगेश भोईर यांनी एस. डी. कॉर्प कंपनीकडून 25 लाख रुपयांची खंडणी मांगितल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आलेली. या प्रकरणी त्यांच्याविरोधात 2 डिसेंबरला गुन्हा दाखल झालेला. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आलेली. पण त्यानंतर काही दिवसांनी त्यांची जेलमधून सुटका झालेली.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.