अनिल देशमुख यांना दिवाळीपूर्वी जामीन मिळणार की नाही? सीबीआयने मांडली ‘ही’ भूमिका

आदेशानुसार शुक्रवारी सीबीआयच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील आशिष चव्हाण यांनी दहा पानांचे प्रतिज्ञापत्र सादर करीत देशमुख यांच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध केला आहे.

अनिल देशमुख यांना दिवाळीपूर्वी जामीन मिळणार की नाही? सीबीआयने मांडली 'ही' भूमिका
देशमुख कुटुंबीयांना आणखी एक दिलासाImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 15, 2022 | 10:41 AM

ब्रिजभान जैस्वार, TV9 मराठी, मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची तुरुंगातून जामीनावर सुटका होण्याचा मुहूर्त लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. आर्थिक अफरातफर प्रकरणात (Money Laundering) देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. याचदरम्यान त्यांनी सीबीआयच्या प्रकरणात विशेष न्यायालयात दाखल केलेल्या जामीनाला सीबीआयने तीव्र विरोध (CBI oppose to Anil Deshmukh bail) केला आहे.

अनिल देशमुख यांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे त्यांना जामीनावर सोडण्यात येऊ नये, असे म्हणणे सीबीआयने प्रतिज्ञापत्राद्वारे मांडले आहे. सीबीआयच्या या विरोधामुळे देशमुख यांना दिवाळीपूर्वी जामीन मिळणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

100 कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात आरोपी

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना याआधी कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या गुन्ह्यात उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्याला ईडीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने देशमुख यांचा जामीन कायम ठेवत त्यांना मोठा दिलासा दिला.

हे सुद्धा वाचा

याचदरम्यान देशमुख यांच्या वतीने सीबीआयच्या प्रकरणातही जामीन मिळवण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. त्यावर विशेष सीबीआय न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी सीबीआयला आपले उत्तर सादर करण्याचा आदेश दिला होता.

दहा पानांचे प्रतिज्ञापत्र सादर करीत जामीनाला विरोध

आदेशानुसार शुक्रवारी सीबीआयच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील आशिष चव्हाण यांनी दहा पानांचे प्रतिज्ञापत्र सादर करीत देशमुख यांच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध केला आहे. देशमुख हे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट मालकांकडून शंभर कोटींची खंडणी वसूल केल्याच्या प्रकरणात आरोपी आहेत.

सीबीआयने विरोध करताना काय म्हटलंय?

अनिल देशमुख यांच्याविरोधातील विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत त्यांची जामीनावर सुटका केल्यास ते तुरुंगाबाहेर आल्यानंतर पुराव्यांमध्ये फेरफार करतील तसेच साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता आहे. तसेच ते देशाबाहेरही पळून जाऊ शकतील, असे सीबीआयने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती के. यू. चांदिवाल यांचा एकसदस्यीय आयोग कायदेशीर वैध नाही. त्यामुळे या आयोगासमोर नोंदवण्यात आलेल्या साक्षीदारांच्या जबाबांवर भरवसा ठेवता येणार नाही, असेही सीबीआयने नमूद केले असून देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळण्याची विनंती केली आहे.

देशमुख यांना विशेष सीबीआय न्यायालयाच्या परवानगीवरून वैद्यकीय चाचण्या आणि संबंधित उपचारासाठी जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....