DHFL Fraud : डीएचएफएल बँक घोटाळा प्रकरण, सीबीआयची मुंबईत छापेमारी, 12.50 कोटींच्या महागड्या वस्तू जप्त

जप्त केलेल्या महागड्या वस्तूंमध्ये एफ. एन. रझा (1956) आणि एफ. एन. सौझा यांनी रेखाटलेल्या दुर्मिळ स्वरुपाच्या पेंटींग्जचा समावेश आहे. या पेंटींग्जची किंमत तब्बल साडेपाच कोटी रुपयांच्या आसपास आहे.

DHFL Fraud : डीएचएफएल बँक घोटाळा प्रकरण, सीबीआयची मुंबईत छापेमारी, 12.50 कोटींच्या महागड्या वस्तू जप्त
डीएचएफएल बँक घोटाळा प्रकरण, सीबीआयची मुंबईत छापेमारीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 5:02 PM

मुंबई : डीएचएफएल बँक (DHFL Bank) आणि येस बँक (Yes Bank) घोटाळाप्रकरणी सीबीआयने आज पुन्हा मुंबईत काही ठिकाणी छापेमारी (Raid) केली. या छापेमारीत एकूण 12 कोटी 50 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यात या जप्त ऐवजात महागडी घड्याळे, पेंटिंगस, सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने यांचा समावेश आहे. या गुन्ह्यात सीबीआयकडून 10 पेक्षा अधिक लोकांना आरोपी बनवण्यात आलंय. याआधी सीबीआयने घोटाळ्यातील मुख्य आरोपी डीएचएफएलचे कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांच्यासह अजय नावंदर यांना अटक केले आहे. या घोटाळा प्रकरणी सीबीआयचे विविध ठिकाणी धाडसत्र सुरुच आहे.

दागिन्यांसह महागड्या पेंटिंग्स आणि घड्याळे जप्त

जप्त केलेल्या महागड्या वस्तूंमध्ये एफ. एन. रझा (1956) आणि एफ. एन. सौझा यांनी रेखाटलेल्या दुर्मिळ स्वरुपाच्या पेंटींग्जचा समावेश आहे. या पेंटींग्जची किंमत तब्बल साडेपाच कोटी रुपयांच्या आसपास आहे. जेकब अँड कंपनी आणि फ्रँक म्युलर जिनेव्ह कंपनीची 5 कोटी रुपये (अंदाजे) किंमतीची दोन घड्याळे आणि 2 कोटी (अंदाजे) किमतीच्या बांगड्या आणि हारासह सोन्याचे आणि डायमंडचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. वळवलेल्या निधीचा वापर करून प्रवर्तकांनी महागड्या वस्तू घेतल्या असा आरोपही करण्यात आला आहे. सीबीआयमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 17 बॅंकांमधील ठेवींच्या घोटाळ्यातील या धडक कारवाईची ही माहिती दिली आहे.

घोटाळ्याप्रकरणी सीबीआयची छापेमारी सुरुच

कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांनी 17 बॅंकांच्या 34 हजार 615 कोटी रुपयांच्या ठेवींमध्ये घोटाळा केला आहे. यामध्ये वाधवान बंधू, रेणुका दिवाण आणि अजय नावंदरसह 10 जणांना आरोपी करण्यात आले आहे. या 17 बँकांतील ठेवींमधील घोटाळा प्रकरणी युनियन बँक ऑफ इंडियाने सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. यानंतर सीबीआयने गुन्हा दाखल करत धाडसत्र सुरु केले. घोटाळ्याच्या तपासात केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सीबीआय) धडक कारवाई केली आहे. या घोटाळा प्रकरणी वाधवान बंधू आणि अजय नावंदर यांना अटक केल्यानंतर सीबीआय अन्य ठिकाणी छापेमारी करत पुढील कारवाई करत आहे. याआधी रेबिका दिवाण आणि अजय नावंदर यांच्यावर सीबीआयने छापे टाकले होते. सीबीआयने 12 ठिकाणी छापेमारी करत 40 कोटींच्या पेंटींगस जप्त केल्या होत्या. (CBI raids Mumbai in connection with DHFL bank scam, seizes valuables worth Rs 12.50 crore)

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.