Raj Kundra | राज कुंद्राची कस्टडी वाढवण्यासाठी गुन्हे शाखेचे प्रयत्न, तर अटक बेकायदेशीर असल्याची हायकोर्टात याचिका

अश्लील चित्रपट प्रकरणात राज कुंद्रा आणि रेयान थोरपे या दोघांची पुन्हा कस्टडी गुन्हा शाखेतर्फे मागितली जाणार आहे. कारण दोघांच्या कस्टडीची मुदत आज संपत आहे.

Raj Kundra | राज कुंद्राची कस्टडी वाढवण्यासाठी गुन्हे शाखेचे प्रयत्न, तर अटक बेकायदेशीर असल्याची हायकोर्टात याचिका
राज कुंद्रा
Follow us
| Updated on: Jul 27, 2021 | 7:38 AM

मुंबई : अश्लील चित्रपट निर्मिती रॅकेट प्रकरणाची मुंबई गुन्हे शाखेतर्फे सध्या चौकशी सुरु आहे. आणखी बऱ्याच जणांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra) आणि रेयान थोरपे यांच्याकडून अनेक महत्त्वाची इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि कागदपत्रंही छापेमारी दरम्यान सापडली आहेत. म्हणून त्याची चौकशी केली जात असून सायबर विशेषज्ज्ञ आणि फॉरेन्सिक एक्स्पर्टची मदतसुद्धा घेतली जात आहे .

राज कुंद्रा आणि रेयान थोरपेची पुन्हा कस्टडी मागणार

अश्लील चित्रपट प्रकरणात राज कुंद्रा आणि रेयान थोरपे या दोघांची पुन्हा कस्टडी गुन्हा शाखेतर्फे मागितली जाणार आहे. कारण दोघांच्या कस्टडीची मुदत आज संपत आहे. गुन्हे शाखेच्या माहितीप्रमाणे अजूनही बऱ्याच तांत्रिक आणि आर्थिक मुद्द्यांवर या दोघांची चौकशी करणे बाकी आहे. त्यामुळे पुन्हा कोर्टात गुन्हे शाखा दोघांच्या पुढील कस्टडीची मागणी करणार आहे .

हायकोर्टात दोन याचिका दाखल

मुंबई हायकोर्टात राज कुंद्रा आणि रेयान थोरपे यांच्या अटकेविरोधात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. दोन्ही याचिकांवर आजच हायकोर्टात सुनावणी होणार आहे. याचिकेत असं म्हटलं गेलं आहे की राज कुंद्रा आणि रेयान या दोघांना 41 A ची नोटिस न देता अटक केली गेली आहे. म्हणून ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. कोर्टात यावर काय निर्णय होणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे .

आर्थिक लेखापरीक्षकाची (ऑडिटर) नेमणूक

या प्रकरणात मोठी आर्थिक उलाढाल झालेली आहे. म्हणूनच मनी ट्रेलची (आर्थिक उलाढाल) चौकशी करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेतर्फे अधिकृतपणे आर्थिक लेखापरीक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अधिकृत आर्थिक लेखा परीक्षक कंपनीची आर्थिक लेखाजोखा, कागदपत्रे, डेटा एंट्री, रोख प्रवाह, बॅलेन्स शीट आणि इतर आर्थिक बाजू तपासणार आहेत.

शिल्पा आणि राज कुंद्रामध्ये भांडण !

अश्लील चित्रपट रॅकेटच्या मुद्द्यावर अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यामध्ये जोरदार भांडण झाल्याची माहिती समोर आली आहे. शिल्पा शेट्टीचा जबाब नोंदवण्यासाठी राज कुंद्राला पोलीस त्याच्या घरी घेऊन गेले होते. तेव्हा शिल्पा आणि राज कुंद्रा या दोघांमध्ये पोलिसांसमोरच जुंपली. इतकी सगळी लफडी केली पण मला काही कळू दिलं नाहीस, असं शिल्पा म्हणाली होती. एवढंच नव्हे तर त्यानंतर रडत रडतच तिने स्टेटमेंट दिलं होतं. या प्रकरणी फेब्रुवारीमध्ये जेव्हा अश्लील चित्रपट प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता, तेव्हाही शिल्पा आणि राज कुंद्रामध्ये भांडण झालं होतं. या प्रकरणामुळे शिल्पाची प्रतिमा फारच मलिन झाली असल्याची तिला खंत आहे. आतापर्यंतच्या तपासात यामध्ये शिल्पा शेट्टीचा सक्रिय सहभाग असल्याची माहिती समोर आलेली नाही, असे गुन्हे शाखेच्या सूत्रांची माहिती आहे.

राज कुंद्राने मोबाईल बदलला

अश्लील चित्रपट प्रकरण जेव्हा फेब्रुवारीमध्ये समोर आलं आणि त्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी या प्रकरणातील प्रमुख राज कुंद्राने अनेक माहिती लपवण्यासाठी आपला मोबाईल फोन बदलून मार्च महिन्यात नवीन फोन घेतला होता. म्हणून सध्या या प्रकरणात तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना त्याच्या मोबाईल फोनमध्ये काय काय होतं, ते रिट्राईव्ह किंवा अर्काईव्ह करण्यासाठी फार मेहनत करावी लागत आहे. अनेक महत्त्वाचे डेटा पोलिसांच्या हाती लागणार नाहीत, असं म्हटलं जात आहे.

शिल्पा आणि राज कुंद्राचं संयुक्त बँक खातं

मुंबई गुन्हे शाखा आता या प्रकरणातील आर्थिक दिशेने तपास करत आहे. क्राईम ब्रँचच्या माहितीप्रमाणे अनेक कोटींचा व्यवहार सुरू होता. गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले की, सर्वप्रथम यूकेमध्ये नोंदणीकृत केनरिनच्या खात्यावर पैसे जमा झाले. तेथून मग अनेक मार्गाने हे पैसे भारतात आणले गेले. एका ऑनलाईन क्रिकेट सट्टेबाजी करणाऱ्या कंपनीनेही राज कुंद्राच्या खात्यात पैसे जमा केल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले की, वेगवेगळ्या खात्यात पैशाचे बरेच व्यवहार झाले आहेत. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांचं एका बँकेत संयुक्त खातं असून त्याचीही चौकशी केली जात आहे.

मुंबई गुन्हे शाखेने म्हटले आहे की राज कुंद्राच नाही तर असे आणखी काही आरोपी आहेत जे असे सिनेमे बनवत होते आणि त्यांचेही बरेच ट्रँझॅक्शन्स आहेत. अरविंद श्रीवास्तव उर्फ यश ठाकूर सिंगापूर येथून कार्यरत होता. राज कुंद्रा आणि यश ठाकूर कधीच एकमेकांना भेटले नाहीत किंवा ते एकमेकांच्या संपर्कातही नव्हते पण सर्वच अशा रॅकेटचा एक भाग होते. म्हणून पैशाचा जो व्यवहार झाला आहे त्याची सखोल चौकशी करण्याची गरज आहे.

संबंधित बातम्या :

अश्लील चित्रपटाच्या हिंदी स्क्रिप्ट मिळाल्या, तपासात अनेक खुलासे, राज कुंद्राच्या अडचणीत वाढ

Raj Kundra | राज कुंद्राच्या काळ्या पैशांचं रहस्य पंजाब नॅशनल बँकेतील खात्यात दडलंय?

(Crime Branch demands to increase custody of Raj Kundra petition in High Court against his arrest)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.