Dahisar Crime : टीव्ही सीरीअलच बघत बसते म्हणून नवऱ्याची बायकोला मारहाण! मारहाणीत बायको रक्तबंबाळ

मारहाण करण्याआधी पत्नीसोबत त्याचा वाद झाला आणि त्यानंतर हा वाद टोकाला गेला. यातूनच नंतर त्याने पत्नीला मारहाण केली.

Dahisar Crime : टीव्ही सीरीअलच बघत बसते म्हणून नवऱ्याची बायकोला मारहाण! मारहाणीत बायको रक्तबंबाळ
पत्नीला मारहाण..Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 25, 2022 | 12:59 PM

मुंबई : महिलांना मालिका (TV Serial News) बघायला आवडतात. पण मालिका बघायला आवडतात, यावरुन एकाने चक्क बायकोला मारहाण केली. सतत सीरियल बघते, याचा राग नवऱ्याला आला. म्हणून त्यानं बायकोला (husband beat wife) एका रुममध्ये डांबल. तिला तुफान मारहाण केली. यात बायको गंभीर जखमी होत, अक्षरशः रक्तबंबाळ झाली होती. यानंतर अखेर पोलिसात तक्रार करण्यात आली. त्यानंतर मारहाण करणाऱ्या पतीला पोलिसांनी अटकही केलीये. हा सगळा प्रकार घडला, दहिसरमध्ये (Mumbai Crime News) राहणाऱ्या एका कुटुंबासोबत. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या पत्नीला शेजारचे रुग्णालयात घेऊन गेले. या जखमी महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गुरुवारी दुपारी ही घटना घडली होती. दहिसर पोलिसांनी या घटनेबाबत अधिक माहित दिली आहे.

नेमकं काय घडलं?

फिरोझ मुज्जव्वर असं पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीचं नाव आहे. तो 42 वर्षांचा असून पोलिसांनी त्याला ताब्यातही घेतलंय. गुरुवारी दुपारी जेव्हा फिरोझ घरी आला, तेव्हा त्यांनी पत्नी मोबाईलमध्ये टीव्ही सीरअल पाहत होती. सारखी टीव्ही सीरअरमध्ये डोकं खूपसून मोबाईलमध्ये असल्याचा त्याला आधीपासूनच राग होता. गुरुवारी दुपारी जेवायला घरी आलेल्या फिरोझला पुन्हा पत्नी मोबाईलवमध्ये सीरिअल पाहत असल्याचं दिसलं. ते दृश्य पाहून त्याचं पित्त खवळलं आणि त्यानं पत्नीला मारहाण केली.

मारहाण करण्याआधी पत्नीसोबत त्याचा वाद झाला आणि त्यानंतर हा वाद टोकाला गेला. यातूनच नंतर त्याने पत्नीला मारहाण केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याआधीही, फिरोझने आपल्या पत्नीला याबाबत ताकीद देत, टीव्ही सीरिअल पाहण्याचा नाद सुटावा म्हणून प्रयत्न केले होते. पण त्या प्रयत्नांना यश येऊ शकलं नव्हतं.

हे सुद्धा वाचा

पाहा महत्त्वाची बातमी :

पतीला अटक

यानंतर मारहाण झालेल्या पत्नीच्या मुलीनेच याबाबत तक्रार दाखल केली. तक्रारीत या मुलीने आपल्या वडिलांनी आपल्या आईला मारहाण केल्याची तक्रार दिली. वडील आईला एका रुममध्ये घेऊन गेले. तिथे तिला कोंडून ठेवत मारहाण केली. आईच्या किंकाळ्यांचा आवाज ऐकून मी बाहेरुन दार उघडण्यासाठी वडिलांना विनंती केली. पण जेव्हा वडिलांनी दार उघडले, तेव्हा आई रक्तबंबाळ झाली होती, असं मुलीनं तक्रारीत म्हटलं आहे. दरम्यान, यानंतर शेजाऱ्यांनी मदत करत आईला दवाखान्यात नेलं आणि तिच्यावर उपचार केलं. तर दिलेल्या तक्रारीच्या आधारं दहिसर पोलिसांनी मारहाण करणारा पती फिरोझला अटकही केली.

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.