Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी ! अमृता फडणवीस यांना 1 कोटीच्या लाचेची ऑफर, डिझायनर विरोधात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

अमृता फडणवीस यांना एका डिझायनर महिलेने एक कोटी रुपयांच्या लाचेची ऑफर दिल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. या प्रकरणी अमृता फडणवीस यांनी या महिलेसह तिच्या वडिलांच्या विरोधात मलबारहिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सर्वात मोठी बातमी ! अमृता फडणवीस यांना 1 कोटीच्या लाचेची ऑफर, डिझायनर विरोधात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?
Follow us
| Updated on: Mar 16, 2023 | 12:07 PM

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एका डिझायनर महिलेने एक कोटी रुपयांच्या लाचेची ऑफर दिली आहे. वारंवार ही ऑफर देण्यात आल्याने अमृता फडणवीस यांनी वैतागून अखेर या डिझायनर महिलेविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मलबार हिल पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेतला आहे. डिझायनर महिला आणि तिच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे. मात्र, थेट उपमुख्यमंत्र्यांच्याच पत्नीला लाचेची ऑफर करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अनिक्षा असं या फॅशन डिझायनरचं नाव आहे. ही डिझायनर गेल्या 16 महिन्यांपासून अमृता फडणवीस यांच्या संपर्कात आली होती. वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये आपण डिझाईन केलेले कपडे अमृता फडणवीस यांनी घालावेत म्हणून ती अमृता यांच्या संपर्कात आली होती. मात्र, अनिक्षाने गेल्या काही दिवसांपासून अमृता फडणवीस यांना एका गुन्ह्यात मदत करण्याची गळ घातली. काही बुकींची माहितीही तिने अमृता फडणवीस यांच्याकडे मागितली. तसेच मदत करण्याची विनंती केली. अनिक्षाकडून वारंवार मदत करण्याची विनंती केली जात होती. त्याबदल्यात त्यांना एक कोटीची लाच देण्याची ऑफरही देण्यात आली. त्यामुळे या जाचाला कंटाळून अखेर अमृता फडणवीस यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

हे सुद्धा वाचा

धमकावणे, कट रचण्याचा गुन्हा

अमृता फडणवीस यांनी अनिक्षा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या दोघांविरोधात धमकावणे, कट रचणे आणि लाचेची ऑफर देणे आदी कलमान्वये गुन्हे दाखल केला आहे. तिच्या वडिलांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. मलबारहिल पोलिसांनी या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक केली नाही. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. इंडियन एक्सप्रेसने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

अनोळखी नंबरवरून मेसेज आणि व्हिडीओ

काही बुकींची माहिती द्या. त्या माध्यमातून पैसे कमावता येतील, असं तिने अमृता यांना सांगितलं होतं. अनिक्षाने 18 आणि 19 फेब्रुवारी रोजी तिचा व्हिडीओ, व्हाईस नोट आणि असंख्य मेसेज अमृता फडणवीस यांना पाठवले होते. ते सर्व अनोळखी नंबरवरून पाठवण्यात आले होते. ही महिला तिच्या वडिलांच्या विरोधात अप्रत्यक्षपणे कट आणि षडयंत्रं रचत होती, असं एफआयआरमध्ये म्हटलं आहे.

दोन वर्षापूर्वी भेटली

नोव्हेंबर 2021मध्ये ही डिझायनर अमृता फडणवीस यांना भेटली होती. यावेळी तिने तिच्या आईचं निधन झाल्यानंतर एकटीनेच घराचा सर्व भार उचलल्याचा दावा केला होता. या पहिल्या भेटीनंतर अनिक्षा ही नंतर अमृता फडणवीस यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी किंवा ऑफिसमध्ये जात असे. सागर बंगल्यावरही ती येत असे. या काळात तिने अमृता फडणवीस यांना काही कार्यक्रमात ड्रेस आणि ज्वेलरी परिधान करण्यासाठी दिली होती.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.