मोठी बातमी! धनंजय मुंडेंकडून खंडणी मागितल्याप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा, खंडणी मागणारी महिला कोण?
Dhananjay Munde : खंडणी दिली नाही, बलात्काराची तक्रार करेन, असं म्हणत या महिलेनं धनंजय मुंडे यांना धमकावलं होतं.
मुंबई : मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडून खंडणी मगितल्याची तक्रार पोलिसात (Police Complaint) देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एका परिचित महिलेने 5 कोटींची खंडणी मागितल्याची तक्रार धनंजय मुंडे यांनी दिली होती. खंडणी न दिल्यास बलात्काराची तक्रार करण्याची धमकी दिल्याचा आरोपही धनंजय मुंडे यांनी या महिलेविरोधात आपल्या तक्रारीत केला आहे. मुंबईच्या मलबार हिल पोलीस (Malbar Hill Police Station, Mumbai) ठाण्यात याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण सध्या क्राईम ब्रांचला वर्ग करून तपासाला देण्यात आलंय. सध्या क्राईम ब्रांच पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. दरम्यान, खंडणी मागून धनंजय मुंडे यांना धमकावणारी ही महिला कोण? असा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे.
काय आहे प्रकरण?
- फेब्रुवारी ते मार्च महिन्यात तक्रार करण्यात आलेल्या महिलेने आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन केला होता.
- इंटरनॅशनल कॉल करुन 5 कोटींचे दुकान आणि महागड्या मोबाईलची मागणी या महिलेनं केल्याची तक्रार धनंजय मुंडे यांच्याकडून देण्यात आली
- मागणी पूर्ण न केल्या सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी मुंडेंना देण्यात आली होती.
- धनंजय मुंडे यांनी या धमकीनंतर ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून 3 लाख रुपये आणि महागडा मोबाईलही कुरियरद्वारे पाठवला होता.
- मात्र तरीही महिला आणखी 5 कोटींच्या ऐवजाची मागणी करत होती. त्यामुळे धनंजय मुंडेंनी तक्रार केल्याचं समजतंय.
- धनंजय मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे.
प्रकरण क्राईम ब्रांचकडे
याप्रकरणी महिलेनं ओशिवरा पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार पोलिसात दाखल केली होती. त्यानंतर ही तक्रार संबंधित महिलेनं मागेही घेतली. मात्र या महिलेनं नंतर इंटरनॅशनल कॉलकरत धनंजय मुंडे यांच्याकडे पैशांची मागणी केली.
मलबार हिल पोलिस ठाण्यात याप्रकरणी धनंजय मुंडे यांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करावी, योग्य तो तपास करावा, अशी मागणी मुंडे यांच्याकडून करण्यात आली. त्यानंतर मलबार हिल पोलिसांनी याप्रकरणी तक्रारही नोंदवून घेतली. त्यानंतर मलबार हिल पोलिसांनी हे संपूर्ण प्रकरण क्राईम ब्रांचकडे अधिक तपासासाठी सोपवलं आहे.
आता क्राईम ब्रांच पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. पोलिसांच्या तपासातून या संपूर्ण प्रकरणी नेमकी काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे खंडणी मागणारी ही महिला कोण? हे देखील पोलीस तपासातून लवकरच समोर येईल, असा विश्वास व्यक्त केला जातोय.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
VIDEO : Yogesh Chile On Dhananjay Munde | धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीची बॉबी डार्लिंग