डोंबिवली बलात्कार प्रकरण, 22 आरोपींच्या कोठडीत वाढ, कोर्टात हजर करताना पोलिसांचा कडक बंदोबस्त

डोंबिवली बलात्कार प्रकरणात पोलिसांनी तब्बल 22 जणांना बेड्या ठोकल्या होत्या. या सर्व आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आरोपींना येत्या 4 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून पोलीस त्यांची आणखी चौकशी करणार आहेत.

डोंबिवली बलात्कार प्रकरण,  22 आरोपींच्या कोठडीत वाढ, कोर्टात हजर करताना पोलिसांचा कडक बंदोबस्त
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Sep 29, 2021 | 5:37 PM

मुंबई : डोंबिवली अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. तब्बल 33 आरोपींनी बलात्कार केल्याचे समोर येताच त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात होती. या मागणीनंतर पोलिसांनी सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. यातील 22 आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आरोपींना येत्या 4 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पोलीस त्यांची आणखी चौकशी करणार आहेत. (dombivali minor rape case police custody of 22 accused extended upto 4 october)

आरोपींना  4 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

डोंबिवली बलात्कार प्रकणातील 22 आरोपींची पोलीस कोठडीची मुदत आज संपल्यामुळे त्यांना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी मानपाडा पोलिसांनी आरोपींची पोलीस कोठडी वाढवण्यात यावी अशी मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींची पाच दिवस म्हणजेच येत्या 4 ऑक्टोबरपर्यंत कोठडी वाढवण्याचा निर्णय दिला. आरोपींना कोर्टात हजर करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

पीडितेवर 8 महिन्यांपासून लैंगिक अत्याचार

डोंबिवली येथे अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याचे समोर येताच राज्यात संतापाची लाट उसळली होती. भाजप तसेच इतर विरोधी पक्षांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली होती.  15 वर्षीय मुलीने मानपाडा पोलीस ठाण्यात आपल्यावर 8 महिन्यांपासून लैंगिक अत्याचार सुरु असल्याबाबत तक्रार नोंदवल्यानंतर चौकशीमध्ये जी माहिती समोर आली ते ऐकून पोलीस हैराण झाले होते.

33 जणांना ठोकल्या बेड्या, पोलिसांकडून तपास सुरु

जानेवारी महिन्यात पीडित तरुणीवर तिच्या प्रियकराने बलात्कार करत तिचा व्हिडीओ काढला होता. हा व्हिडीओ तरुणाने आपल्या मित्रांना दाखवला. त्यानंतर याच व्हिडीओच्या आधारे आतापर्यंत 33 जणांनी या पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले होते. बदलापूर, रबाळे, मुरबाड आणि डोंबिवलीत वेगवेगळ्या ठिकाणी तिला घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला गेला होता. या प्रकरणातील सर्वसच्या सर्व म्हणजेच 33 आरोपींना मानपाडा पोलिसांनी  ताब्यात घेतलेलं आहे. यामध्ये दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत.

इतर बातम्या :

सासरच्यांना भेटून आला, रात्री उशिरापर्यंत गावकऱ्यांसोबत गप्पा, सकाळी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत, घरातल्या पाच जणांचा रहस्यमय मृत्यू

नागपूरच्या गजबजलेल्या मार्केट परिसरात देहविक्रीचा धंदा, लॉजवर पोलिसांचा सापळा, अखेर तरुणीचा सुटका, आरोपीला बेड्या

जळगावमध्ये हात-पाय बांधून डॉक्टर तरुणीवर बलात्कार; दुसऱ्यासोबत लग्न केल्यास ठार मारण्याची धमकी

पुण्यात साकारला जातोय शरद पवारांचा पुतळा, सुप्रिया सुळेंकडून शिल्पकाराचं कौतुक https://t.co/3gLqyRo6Yi @supriya_sule @PawarSpeaks @AjitPawarSpeaks @RRPSpeaks @parthajitpawar @NCPspeaks #sharadpawar #MetalStatue #SupriyaShinde #SupriyaSule #Ambegaon #Pune #NCPPresident

— TV9 Marathi (@TV9Marathi) September 29, 2021

(dombivali minor rape case police custody of 22 accused extended upto 4 october)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.