Mumbai Crime : अंधेरीत दुहेरी हत्याकांड, वयोवृद्ध इसमाकडून पत्नी आणि मुलीची हत्या
आरोपी आपली पत्नी आणि मानसिक विकलांग मुलीसह अंधेरीतील शेर ए पंजाब कॉलनीत राहत होते. मयत जसबीरकौर या गेल्या 10 वर्षांपासून आजारी आहे. त्यांची अँजिओग्राफी झाली होती. तसेच त्यांना गुडघेदुखीचा त्रास होता. त्यामुळे त्यांना चालता येत नसल्याने त्या बेडवरच पडून असायच्या. तर कमलजीतकौर ही मानसिक रुग्ण असून अविवाहित होती.
मुंबई : पत्नीच्या सततच्या आजारपणाला आणि देखभालीला कंटाळून वयोवृद्ध पतीने पत्नी आणि मानसिक विकलांग मुलीची गळा चिरुन हत्या(Murder) केल्याची धक्कादायक घटना अंधेरीतील शेर ए पंजाब कॉलनीत घडली आहे. याप्रकरणी मेघवाडी पोलीस ठाण्या(Meghwadi Police Station)त हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरुषोत्तम सिंग गंडहोक(89) असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव असून जसबीरकौर गंडहोक(81) आणि कमलजीतकौर गंडहोक(55) अशी हत्या करण्यात आलेल्या मायलेकींची नावे आहेत. मयत महिला जसबीरकौर या गेल्या 10 वर्षांपासून आजारी होत्या शिवाय मुलगीही मानसिक विकलांग होती. यामुळे या दोघींचा सांभाळ करण्याला कंटाळून आरोपीने हे टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी गंडहोक यांची मोठी विवाहित मुलगी गुरुबिंदरकौर राजबंस आनंद यांच्या फिर्यादीवरुन मेघवाडी पोलीस ठाण्यात कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. (Double murder in andheri, murder of wife and daughter by an elderly man)
आरोपी आपली पत्नी आणि मानसिक विकलांग मुलीसह अंधेरीतील शेर ए पंजाब कॉलनीत राहत होते. मयत जसबीरकौर या गेल्या 10 वर्षांपासून आजारी आहे. त्यांची अँजिओग्राफी झाली होती. तसेच त्यांना गुडघेदुखीचा त्रास होता. त्यामुळे त्यांना चालता येत नसल्याने त्या बेडवरच पडून असायच्या. तर कमलजीतकौर ही मानसिक रुग्ण असून अविवाहित होती.
हत्या केल्यानंतर आरोपीने मोठ्या मुलीला फोन करुन माहिती दिली
आरोपी पुरुषोत्तम गंडहोक यांनी सोमवारी सकाळी 8.40 वाजता आपली मोठी मुलगी गुरुबिंदरकौर हिला फोन करुन आपल्याला आई आणि बहिणीचं दु:ख सहन होत नव्हतं व आपल्याला त्यांची देखभाल करणेही जमत नव्हते. त्यामुळे आपण त्या दोघींना संपवून टाकले असे फोन करुन सांगितले. गुरुबिंदरकौर यांनी आपल्या पती व मुलाला ही बाब सांगितली. त्यानंतर तिघेही आई-वडिलांच्या घरी दाखल झाले. मात्र दरवाजा आतून बंद होता. गुरुबिंदरकौर यांनी आई आणि बहिणीला आवाज देण्यास सुरुवात केली. परंतु आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता. घराच्या खिडक्याही आतून बंद होत्या. त्यामुळे गुरुबिंदरकौर यांनी वडिलांना आवाज दिला असता त्यांनी पोलिसांना बोलव तेव्हाच दरवाजा उघडेन असे अट्टाहास केला. अखेर गुरुबिंदरकौर यांनी मेघवाडी पोलिसांनी याबाबत कळवले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आपली ओळख आरोपीला पटवून दिल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडला. पोलिसांनी आत जाऊन पाहिले असता दोघी मायलेकी रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळल्या. (Double murder in andheri, murder of wife and daughter by an elderly man)
इतर बातम्या
बाळाला दूध पाजत असतानाच भरधाव कारने चिरडलं, मुंबईत कुठे घडलं पुन्हा हिट एन्ड रन?