मुंबईत अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून कारवाईचा सपाटा सुरूच, 44 लाखांचे ड्रग्स जप्त
चार दिवसांपूर्वीच अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे युनिटने मुंबईतल्या सहार व्हिलेज परिसरात मोठे सर्च ऑपरेशन करत ड्रग्स जप्त केले होते. नायजेरियन टोळीच्या माध्यमातून हे ड्रग्स शाळा आणि कॉलेज परिसरात विकले जात असल्याचं तपासात समोर आलं होतं.
मुंबई / कृष्णा सोनारवाडकर (प्रतिनिधी) : मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून मागच्या काही दिवसात झपाट्याने कारवाया केल्या जात आहेत. दोन दिवसांपूर्वीच शाळा आणि महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना छुप्या पद्धतीने ड्रग्स पुरवणाऱ्या एका नायजेरियन टोळीचा पर्दाफाश अंमली पदार्थ विरोधी पथकाने केला होता. मुंबई शहरात सध्या अशाच झपाट्याने कारवाया केल्या जात आहेत. एमडी हे महागडे ड्रग्स छोट्या छोट्या प्रमाणात काही ठिकाणी विकल जात असल्याचे कळते. त्यानुसार पोलीस मोठ्या प्रमाणात कारवाया करत आहेत. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने माझगाव डॉकयार्ड परिसरात एका इसमाला ताब्यात घेत 44 लाख रुपये किमतीचे 220 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त केलं. अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटने ही कारवाई केली.
मुंबई शहरात अनेक भागात अशा पद्धतीने ड्रग्सची विक्री होत असतानाच पोलिसांची बारकाईने नजर असते. विशेषतः शाळा आणि कॉलेज परिसरात विशेष गस्त ठेवून मुंबई पोलीस सातत्याने कारवाई करत असतात.
सर्च ऑपरेशन राबवत ड्रग्ज जप्त
चार दिवसांपूर्वीच अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे युनिटने मुंबईतल्या सहार व्हिलेज परिसरात मोठे सर्च ऑपरेशन करत ड्रग्स जप्त केले होते. नायजेरियन टोळीच्या माध्यमातून हे ड्रग्स शाळा आणि कॉलेज परिसरात विकले जात असल्याचं तपासात समोर आलं होतं.
तीन नायजेरियन व्यक्तींना अटक
पोलिसांनी या प्रकरणात एकूण तीन नायजेरियन व्यक्तींना बेड्या ठोकल्या होत्या. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात मुंबईभर कारवाया केल्या जात आहेत.