विवेक पाटलांनी बोगस खात्यांद्वारे कोट्यवधीचं लोन स्वत:च्या संस्थेत वळवले, ईडीच्या तपासात धक्कादायक माहिती उघड
कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या तपासात ज्या गोष्टी उघड झाल्या आहेत त्या धक्कादायक आहेत (ED investigation reveals shocking information on Karnala Bank scam).
मुंबई : शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि माजी आमदार विवेक पाटील यांना कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केली आहे. ईडीने मंगळवारी (15 जून) रात्री उशिरा विवेक पाटील यांना त्यांच्या पनवेल येथील राहत्या घरातून अटक केली. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घराचीदेखील झाडाझडती घेतल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर ईडीने आज विवेक पाटील यांना कोर्टात हजर केलं असता त्यांना 25 जूनपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली (ED investigation reveals shocking information on Karnala Bank scam).
ईडीने कोर्टात या प्रकरणी केलेल्या तपासात जे खुलासे केले ते धक्कादायक आहे. विवेक पाटील यांनी बोगस अकाउंट बनवून कोट्यवधीचं लोन दिल्याचं दाखवलं. नंतर ते पैसे स्वत:च्या संस्थांच्या अकाउंटमध्ये वळवले, अशी धक्कादायक माहिती ईडीने कोर्टात दिली. त्यामुळे कोर्टाने याप्रकरणी विवेक पाटील यांनी 25 जूनपर्यंत कोठडी सुनावली. ईडी याप्रकरणी पुढील तपास करत आहे (ED investigation reveals shocking information on Karnala Bank scam).
रिझर्व्ह बँकेने नेमलेल्या अधिकाऱ्याच्या तपासात धक्कादायक माहिती उघड
कर्नाळा नागरी सहकारी बँकेत सुमारे 512 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. हा लोन घोटाळा आहे. 2018 साली रिझर्व्ह बँकेला बँकेच्या व्यवहारात अनियमितता असल्याचं लक्षात आलं होतं. यानंतर रिझर्व्ह बँकेने चौकशी करण्यासाठी अधिकारी नेमला होता. या अधिकाऱ्याने केलेल्या चौकशीत कर्नाळा बँकेच्या व्यवहाराबाबत धक्कादायक माहिती समोर आली.
63 व्यक्तींना संश्यास्पद लोन
माजी आमदार विवेक पाटील हे या बँकेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. या बँकेत सुमारे 60 हजार खातेधारक आणि ठेवीदार आहेत. या खातेदारांची शेकडो कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. बँकेने 63 व्यक्तींना संशयास्पद लोन दिलं होतं. यावेळी लोन घेणाऱ्याकडून कोणतं तारण घेण्यात आलं नव्हतं. लोन मंजूर कागदपत्रांवर संचालक मंडळाच्या सह्या नव्हत्या. लोनबाबत स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली नव्हती. अनेक त्रुटी होत्या.
विवेक पाटील यांच्याकडून पदाचा गैरवापर
सर्वात महत्वाचं म्हणजे हे 63 खात्यावर देण्यात आलेलं लोन हे दोन खात्यावर वळवण्यात आले होते. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट या खात्यावर पैसे वळवण्यात आले होते. या अकॅडमी आणि ट्रस्टचे अध्यक्ष देखील विवेक पाटील हेच आहेत. पाटील यांनी पदाचा गैरवापर करून खातेदारांचे पैसे बोगस लोनद्वारे आपल्या संस्थांच्या खात्यावर मिळवले होते. या सर्व बाबी ईडीच्या तपासात उघड झाल्या आहेत. याबाबतची सविस्तर माहिती ईडी अधिकाऱ्यांनी ईडी कोर्टाला दिली. यानंतर विवेक पाटील यांना 25 जूनपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली.
संबंधित बातमी : मोठी बातमी ! कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीकडून अटक