अनिल देशमुखांना ईडीकडून तिसरं समन्स, हजर राहण्याचे आदेश; देशमुख दिल्लीला रवाना?

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने तिसरं समन्स बजावलं आहे. देशमुख यांना येत्या 5 जुलै रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Anil Deshmukh)

अनिल देशमुखांना ईडीकडून तिसरं समन्स, हजर राहण्याचे आदेश; देशमुख दिल्लीला रवाना?
Anil Deshmukh
Follow us
| Updated on: Jul 03, 2021 | 10:19 AM

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने तिसरं समन्स बजावलं आहे. देशमुख यांना येत्या 5 जुलै रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर, चौकशीच्या ससेमिऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी देशमुख दिल्लीला रवाना झाले असून सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (ED issues third summons Anil Deshmukh in money laundering case)

अनिल देशमुख यांना ईडीने दोनदा समन्स बजावलं होतं. आधी त्यांनी प्रकृती ठिक नसल्याचं कारण देऊन ईडीच्या चौकशीला गैरहजर राहिले होते. नंतर त्यांनी सात दिवसाची मुदत मागवून घेतली होती. येत्या सोमवारी 5 जुलै रोजी त्यांची ही मुदत संपत आहे. त्यामुळे ईडीने आज त्यांना समन्स बजावलं असून सोमवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे देशमुख सोमवारी ईडीच्या चौकशीला सामोरे जातात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

देशमुख दिल्लीत

दरम्यान, ईडीने समन्स बजावल्यानंतर देशमुख दिल्लीला रवाना झाले आहेत. देशमुख दिल्लीत कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून कायदेशीर बाबींबाबत सल्ला घेणार आहेत. तसेच ते सर्वोच्च न्यायालयातही धाव घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ईडीचा कागदपत्रं देण्यास नकार

दरम्यान, ईडीने देशमुख यांच्याकडे काही कागदपत्रं मागितली आहे. त्यासाठी देशमुख यांनी ईडीकडे ‘ECIR’ ची कॉपी मागितली होती. ती देण्यास ईडीने नकार दिल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

पीएंना अटक

दरम्यान, एप्रिल महिन्यात आधी देशमुख यांची सीबीआयने चौकशी केली होती. त्यानंतर आता देशमुख यांची ईडीने चौकशी सुरु केली आहे. 25 जून रोजी ईडीने देशमुख यांच्या पाच ठिकाणांवर छापेमारी केली. त्यानंतर ईडीने देशमुख (Anil Deshmukh) यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे (Kundan Shinde) आणि संजीव पालांडे (Sanjeev Palande) यांना अटक केली. अंमलबजावणी संचालनालय मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्या (PMLA) अंतर्गत शिंदे आणि पालांडे यांना अटक करण्यात आली. (ED issues third summons Anil Deshmukh in money laundering case)

संबंधित बातम्या:

ईडीची दिवसभर छापेमारी, नागपूर-मुंबईच्या निवासस्थानी धाडी, अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया काय?

Anil Deshmukh | अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, दोन्ही स्वीय सहाय्यकांना ईडीकडून अटक

सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करा, देशमुखांच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी

(ED issues third summons Anil Deshmukh in money laundering case)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.