Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजोय मेहतांचा नरिमन पॉईंट परिसरात अलिशान फ्लॅट, ईडीने बिल्डरचा जबाब नोंदवला, अविनाश भोसले प्रकरणाची देखील चौकशी

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कंपनीत आधी भागीदार असलेले निखिल गोखले यांचा ईडीने आज (11 ऑगस्ट) जबाब नोंदवला आहे.

अजोय मेहतांचा नरिमन पॉईंट परिसरात अलिशान फ्लॅट, ईडीने बिल्डरचा जबाब नोंदवला, अविनाश भोसले प्रकरणाची देखील चौकशी
अजोय मेहता
Follow us
| Updated on: Aug 11, 2021 | 6:05 PM

मुंबई : बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कंपनीत आधी भागीदार असलेले निखिल गोखले यांचा ईडीने आज (11 ऑगस्ट) जबाब नोंदवला आहे. महारेराचे चेअरमन आणि माजी सनदी अधिकारी अजोय मेहता यांनी नरिमन येथील समता सोसायटीत फ्लॅट विकत घेतला आहे. निखिल गोखले हे अनामित्रा प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडचे देखील डायरेक्टर आहेत. त्यांच्याकडूनच अजोय मेहता यांनी नरिमन पॉईंट येथील 1076 चौरस फुटाचा फ्लॅट 5.33 कोटी रुपयात खरेदी केला होता. ईडी अधिकाऱ्यांना याच व्यवहारात संशय आहे.

ईडी अधिकाऱ्यांना नेमका काय संशय?

ईडी अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार संबंधित फ्लॅटची किंमत आणि व्यवहारची रक्कम यात विसंगती आहे. त्यामुळे या व्यवहाराबाबत इनकम टॅक्स विभागाला संशय वाटत होता. या व्यवहाराबाबत इनकम टॅक्स विभागाने नोटीस बजावली होती. त्याचबरोबर निखिल गोखले हे अविनाश भोसले यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीत संचालक होते.

नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चौकशी?

अविनाश भोसले यांची ईडीकडून दोन प्रकरणात चौकशी सुरु आहे. एक प्रकरण फेमा कायद्या संदर्भातील आहे तर दुसरं प्रकरण मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित आहे. तसेच निखिल गोखले अविनाश भोसले यांच्याशी संबंधित आहेत. तसेच त्यांनी अजोय मेहता यांना फ्लॅट विकला आहे. त्यामुळे या व्यवहाराचा देखील अविनाश भोसले यांच्याशी काही संबंध आहे का? या अनुषंगाने देखील ईडीच्या अधिकाऱ्यांना निखिल गोखले यांच्याकडून माहिती घ्यायची होती. यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांनी निखिल गोखले यांना समन्स पाठवून बोलवलं होतं. त्यानुसार निखिल गोखले यांनी ईडी कार्यालयात हजर होत जबाब नोंदवला.

अविनाश भोसले ईडीच्या रडारवर

गेल्या काही महिन्यांपासूनपुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) आणि त्यांचा मुलगा अमित हे ईडीच्या रडारवर आहेत. गेल्याच महिन्यात त्यांची 5 तास चौकशी केली होती. मनी लाँडरिंग प्रकरणात दोघांना ईडीने समन्स पाठवलं होतं. पुणे येथील एका जमीनीवर अविनाश भोसले यांनी बांधकाम केलं आहे, जी जमीन सरकारी होती. या जमिनीबाबत पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ईडीनेदेखील गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं.

40 कोटींची मालमत्ता जप्त

अविनाश भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे. फेमा कायद्याअंतर्गत ईडीने भोसले यांची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. विदेशी चलन प्रकरणात भोसले यांची दोन वेळा चौकशी झाली होती. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं होतं. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली होती.

मुंबईत 103 कोटींच्या फ्लॅटची खरेदी!

अविनाश भोसले यांनी दक्षिण मुंबईत एक डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला आहे. अविनाश भोसले यांच्या ‘एबी’ज रिअलकॉन एलएलपी या कंपनीने ही गुंतवणूक केली आहे. या फ्लॅटसाठी त्यांनी 103 कोटी 80 लाख रुपये मोजले आहेत.

भोसले यांची ईडीविरोधात याचिका

बिल्डर अविनाश भोसले यांच्या विरोधात पुणे येथील जमिनीबाबत गुन्हा दाखल आहे. याबाबत ईडीने मनी लाँडरिंगप्रकरणी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी ईडीने 11 फेब्रुवारीला भोसले यांच्याशी संबंधित चार ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. यावेळी अविनाश भोसले याचा मुलगा अमित भोसले याला ताब्यात घेऊन त्याची चार तास चौकशी केली होती.

या चौकशीनंतर 12 फेब्रुवारीला अविनाश भोसले आणि अमित भोसले यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, हे दोघेही चौकशीसाठी हजर झाले नाहीत. यानंतर भोसले यांनी ईडीविरोधात गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका केली होती. तसेच 17 फेब्रुवारीला भोसले यांना ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं होतं.

कोण आहेत अविनाश भोसले?

  • रिक्षावाला ते रियल इस्टेट किंग असा अविनाश भोसले यांचा प्रवास आहे.
  • अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत.
  • कोट्यवधी रुपयांचा एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत.

नगर जिल्ह्यातल्या संगमनेर शहरातून अविनाश भोसले रोजगाराच्या शोधात पुण्यात आले. त्यांनी रिक्षाचालक म्हणून सुरुवात केली. पुण्यातील रास्ता पेठ भागात भाड्याच्या घरात राहून अविनाश भोसले यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केला. अल्पावधीत रिक्षा भाड्याने देण्याचा व्यवसाय ते करु लागले. त्यानंतर अविनाश भोसले यांची ओळख बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींशी आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदारीच्या माध्यमातून काम करणाऱ्यांशी झाली. यानंतर अविनाश भोसले यांनी रस्ते तयार करण्याची लहान-मोठी कंत्राटं घेतली.

हेही वाचा : लाचखोरी प्रकरणात नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर फरार घोषित

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.