ब्रिजभान जैसवार, मुंबई | 5 नोव्हेंबर 2023 : जेट एअरवेज का बुडाली, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आर्थिक गणितं जुळतं नसल्याने हा प्रकार घडल्याचे अनेकांना वाटत होते. पण अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जेट एअरवेज बुडण्यामागची कारणं शोधून काढली आहेत. त्याच्या सुरस कथा आता समोर येत आहे. जेट एअरवेजचे माजी संचालक नरेश गोयल यांच्याविरोधात ईडीने अगोदरच कारवाईचा फास आवळला आहे. गोयल सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांच्यासह पत्नी आणि इतर आरोपींविरोधात ईडीने यापूर्वीच दोषारोपपत्र दाखल केले आहे. आता पुरवणी दोषारोपपत्र मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टात सादर करण्यात आले आहे. त्यात मॉस्किटो कॉइल फर्म ते हिरे निर्यातदार, असा नरेश गोयल यांनी जेटचा निधी कसा ‘वळवला’ याची माहिती दिली आहे.
इतक्या कोटींचा कथित घोटाळा
ई़डीने या आठवड्याच्या सुरुवातीला नरेश गोयल, त्यांची पत्नी अनिता, त्यांच्या कंपन्या आणि इतर संस्थांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. त्यात हा कथित घोटाळा 6,000 कोटी रुपयांचा असल्याचे म्हटले आहे. जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेड विरोधात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक अधिनियम (PMLA) 2002 मधील विविध कलमांन्वये ही कारवाई करण्यात आली.
असा वळवला पैसा
उजव्या हाताने, डाव्या हाताला गेला पैसा
गोयल यांनी जेट लाइट लिमिटेडला 4,057 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे JIL अनुदान कर्ज देऊन निधी पळवून नेल्याचा आरोप आहे परंतु त्यातील मोठा भाग तिकीट विक्रीसाठी समायोजित केला एजन्सीने असा दावा केला आहे की गोयल यांनी जनरल सेल्स एजंटना (GSA) “अतार्किक” आणि “फुगवलेले” कमिशन देऊन निधी पळविला. यापैकी जवळपास 50 टक्के निधी त्यांच्याच कंपन्यांनी कडे गेल्या त्यात जेआयएलचे काही व्यावसायिक आणि सल्लागारांशी देखील आर्थिक व्यवहार होते मात्र ज्यांच्याशी सेवा प्रदान केल्याचा कोणताही पुरावा नाही. नरेश गोयल सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांचा मुक्काम सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत.