डोंबिवलीची घटना ताजी असताना कल्याणमध्ये आठ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना

डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी असताना कल्याणमध्ये देखील एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका शिकवणी चालविणाऱ्या शिक्षकाने अवघ्या 8 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

डोंबिवलीची घटना ताजी असताना कल्याणमध्ये आठ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना
आरोपी शिक्षकाचा फोटो
Follow us
| Updated on: Sep 23, 2021 | 7:43 PM

कल्याण (ठाणे) : डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी असताना कल्याणमध्ये देखील एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका शिकवणी चालविणाऱ्या शिक्षकाने अवघ्या 8 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेच्या आईने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर संबंधित प्रकार उघड झाला. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आरोपी मुदर तालवाला याला अटक केली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

कल्याणच्या एका हाय प्रोफाईल सोसायटीत राहणारी आठ वर्षीय पीडित चिमुकली याच परिसरातील एका शिक्षिकेकडे शिकवणीला जायची. काही दिवसांपूर्वी शिक्षिका माहेरी गेली होती. त्यामुळे शिक्षिकेचा पती शिक्षक मुदर तालवाला हा मुलांची शिकवणी घेत होता. या दरम्यान पीडित आठ वर्षीय चिमुकली शिकवणीला जायला तयार नव्हती. जेव्हा तिची आई शिकवणीला जायला सांगत तेव्हा ती रडायला सुरुवात करायची.

पीडितेच्या आईची पोलीस ठाण्यात तक्रार

पीडितेच्या आईला संशय आला. आईने मुलीला विश्वासात घेत विचारलं तेव्हा मुलीने घडलेला प्रकार हावभाव करुन दाखविला. त्यानंतर आई समजून गेली की आपल्या मुलीसोबत काय प्रकार घडला आहे, तो कोणी केला असावा या संदर्भातील सगळी माहिती बाजारपेठ पोलिसांना देण्यात आली.

पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या

या प्रकरणाची गंभीर दखल घेत बाजारपेठ पोलिसांनी चौकशी सुरु केली. पोलिसांनी या प्रकरणी 42 वर्षीय शिक्षक मुदर तालवाला याला अटक केली. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राजेंद्र अहिरे यांनी दिली. दरम्यान, एका शिक्षकाने आठ वर्षीय विद्यार्थीनीवर अशा प्रकारचं कृत्य केल्याने शिक्षकी पेशाला काळीमा फासली गेल्याची प्रतिक्रिया स्थानिकांकडून देण्यात आली आहे.

डोंबिवलीची नेमकी घटना काय?

दुसरीकडे डोंबिवलीत 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे डोंबिवली हादरली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोन अल्पवयीन मुलांसह 23 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आरोपींमध्ये काही राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याची देखील प्राथमिक माहिती समोर येत आहे.

प्रियकराने बलात्कार करत व्हिडीओ बनवला, नंतर 29 जणांचा बलात्कार

प्रियकराने जानेवारी महिन्यात पीडित मुलिवर बलात्कार करत व्हिडियो काढला होता. या व्हिडिओच्या आधारे पीडित अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करत तिच्यावर 29 जणांनी बलात्कार केल्याची माहिती सध्या समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु केला असून आणखी काही आरोपींची नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे.

पीडितेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार

जानेवारी महिन्यात पीडित तरुणीवर तिच्या प्रियकराने बलात्कार करत तिचा व्हिडियो काढला होता. हा व्हिडियो या तरुणाने आपल्या मित्रांना दाखवला. या व्हिडियोच्या आधारे आतापर्यंत 29 जणांनी या पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले. बदलापूर, रबाळे, मुरबाड आणि डोंबिवलीत वेगवेगल्या ठिकाणी तिला घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला गेला. मानपाडा पोलिसांनी आतापर्यंत 23 जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यामध्ये दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत. 21 आरोपींच्या अटकेनंतर पोलीस सहा आरोपींच्या शोधात आहेत.

हेही वाचा :

पतीचा चारित्र्यावर संशय, संतापलेल्या पत्नीकडून 3 लाखांची सुपारी, नागपुरातील महिलेने नवऱ्याचा काटा काढला

अवघ्या 15 वर्षाच्या मुलीवर 29 जणांकडून सामूहिक बलात्कार, पीडितेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.