मुंबई : मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने घाटकोपर परिसरात मोठी कारवाई करत कर्ज देण्याच्या आमिषाने लोकांची फसवणूक (Fraud) करणाऱ्या एका रॅकेट (Racket)चा पर्दाफाश केला आहे. घाटकोपर पूर्वेकडे गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने कारवाई करत एका इमारतीत सुरू असलेल्या फेक कॉल सेंटरचा पर्दाफाश करत एकूण चार आरोपींना अटक केलेली आहे. चारही आरोपी हे बारावी ते पदवी प्राप्त केलेले असून लोकांना फोन करून कर्ज देण्याच्या बहाण्याने प्रोसेसिंग फीच्या नावाखाली लोकांकडून पैसे उकळत होते. (Exposing the racket of cheating people under the pretext of giving loans in mumbai)
आतापर्यंत तपासामध्ये आरोपींनी 13 पेक्षा जास्त लोकांची लाखो रुपयांपर्यंत फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी अटक होण्याची शक्यता आहे. आरोपी लोकांना फोन करून कर्जा संदर्भात माहिती द्यायचे. शिवाय पीडित लोकांकडून कागदपत्र मागून घ्यायचे आणि त्यानंतर इन्शुरन्स त्याचबरोबर प्रोसेसिंग फीच्या नावाखाली पैसे उकळायचे. युनिट 3 कडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून आणखी काही आरोपी पोलिसांच्या रडारवर आहेत.
अमेरिकन बनावट डॉलर दाखवून त्याच्या बदल्यात भारतीय चलन घेऊन फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. वेळप्रसंगी भारतीय चलन देणाऱ्यावर हल्ला करून रक्कम पळविणे असाही हेतू त्यांचा होता. नांदेडमध्ये आलेल्या तेलंगणातील या टोळीला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून एक बिलियन डॉलरची एक बनावट नोट जप्त केलीय. ह्या नोटेची भारतीय चलनातील किंमत साडेसातशे कोटी रुपये असल्याचे आरोपींने भासवले होते. आरोपींकडून कार, रोख आदी साहित्य असा 11 लाख 52 हजार 350 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. फसवणूक करणाऱ्या टोळीतील तीन लोकांना पोलिसांनी अटक केली तर दोघेजण गर्दीचा फायदा घेत पसार झाले. (Exposing the racket of cheating people under the pretext of giving loans in mumbai)
इतर बातम्या
Palghar Murder : पालघरमध्ये जमिन आणि पैशाच्या वादातून इसमाची हत्या
नागपूर पोलिसांकडून अल्पवयीन चोराला अटक, दागिन्यांसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त