Fake NIA Officer : एनआयएकडून अटक टाळण्यासाठी सलीम फ्रूटकडून 50 लाख उकळले, फेक एनआयए अधिकारी अटक

सलीमला अटक केल्यानंतर त्याची चौकशी केली असता ही खंडणीची बाब उघडकीस आली. त्यानुसार एनआयए अधिकाऱ्यांनी काळेला पकडले आणि नंतर त्याला मुंबई गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले.

Fake NIA Officer : एनआयएकडून अटक टाळण्यासाठी सलीम फ्रूटकडून 50 लाख उकळले, फेक एनआयए अधिकारी अटक
एनआयएकडून अटक टाळण्यासाठी सलीम फ्रूटकडून 50 लाख उकळलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 5:56 PM

मुंबई : एनआयएकडून होणारी अटक टाळण्यासाठी गुंड सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट (Salim Fruit)कडून 50 लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या फेक एनआयए अधिकाऱ्या (Fake NIA Officer)ला अटक (Arrest) करण्यात आली आहे. विशाल काळे (30) असे फेक एनआयए अधिकाऱ्याचे नाव आहे. एनआयएने काळेला अटक करुन, मुंबई गुन्हे शाखेच्या स्वाधीन करण्यात आले आहे. सलीम फ्रूटला गेल्या आठवड्यात एनआयएने अटक केली आहे. दाऊद इब्राहिमला दहशतवादी कारवायांसाठी खंडणी आणि इतर बेकायदेशीर कामांद्वारे निधी पुरवल्याच्या आरोप सलीमवर आहे. सलीम फ्रूट हा कुख्यात गँगस्टर छोटा शकीलचा साडू आहे.

सलीमला एनआयएकडून समन्स बजावण्यात आले होते

गेल्या महिन्यात सलीम फ्रूटला एनआयएच्या अधिकाऱ्यांनी अनेक समन्स पाठवले होते. यामुळे आपल्याला केव्हाही अटक होऊ शकते याचा अंदाज सलीमला होता. याचदरम्यान तो विशाल काळेच्या संपर्कात आला. विशालने आपण एनआयए अधिकारी असल्याचे सलीमला सांगितले. तसेच आपले नाव देवराज सिंह असल्याचे सांगितले. त्यानंतर सलीमला दिल्लीला बोलावून परत पाठवले. यादरम्यान काळेने आपले राजकीय संबंध आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचा दावा करत, सलीमला या प्रकरणात एनआयएची अटक टाळण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्याने काळेला 50 लाख रुपये दिले.

विशाल काळेवर खंडणीचा गुन्हा दाखल

सलीमला अटक केल्यानंतर त्याची चौकशी केली असता ही खंडणीची बाब उघडकीस आली. त्यानुसार एनआयए अधिकाऱ्यांनी काळेला पकडले आणि नंतर त्याला मुंबई गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले. मुंबई गुन्हे शाखेने काळेवर खंडणीचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. गुन्हे शाखा काळे आणि त्याच्या साथीदारांची माहिती घेत आहे. (Fake NIA officer arrested for taking 50 lakhs from Salim Fruit to avoid arrest by NIA)

हे सुद्धा वाचा

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.