कुर्ल्यातील युट्युबर निघाला चोरटा! नाव अभिनव गुप्ता, 150 CCTV तपासल्यानंतर सापडला भामटा

| Updated on: May 28, 2022 | 12:41 PM

कुर्ला पश्चिमेच्या ख्रिश्चन गावात 18 मे रोजी चोरीची घटना घडली होती. एका घरामधून तब्बल 25 तोळे सोनं या चोरट्यानं लंपास केलं होतं.

कुर्ल्यातील युट्युबर निघाला चोरटा! नाव अभिनव गुप्ता, 150 CCTV तपासल्यानंतर सापडला भामटा
युट्युबर चोरटा
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : कुर्ल्यात (Kurla crime) घरफोड्या करणाऱ्या एका तरुणाला अटक  करण्यात आली आहे. हा तरुण युट्युबर (you tuber theft arrested) म्हणून मिरवत होता. चोरीच्या पैशांतून मौजमजा करत त्याने व्हिडीओ बनवले. अनेक बंद घरांमध्ये हातचलाखीनं त्यांनी चोऱ्या केल्या. या चोरट्याला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या असून युट्युबर तरुणाचं नाव अभिनव गुप्ता असल्याचं समोर आलं आहे. अभिनव गुप्ता या 26 वर्षांचा असून त्याच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आलाय. विशेष म्हणजे या चोरट्याचा शोध घेण्यासाठी जवळपास दीडशे सीसीटीव्ही कॅमेरांमधील फुटेज (Mumbai Police CCTV Footage) पोलिसांनी तपासलं. त्यातून या तरुणाची माहिती पोलिसांच्या हाती लागली. अनेक गुन्हे या तरुणाच्या नावावर असल्याचंही पोलिसांच्या तपासातून समोर आलं. बारावी पर्यंत शिकलेल्या या युट्युब तरुणाची आता कसून चौकशी केली जातेय.

बंद घरांची चोरी

बंद घरांमध्ये चोऱ्या करण्याची अभिनवला सवय होती. बंद घरांमध्ये घुसून घरातील सोनं आणि मुद्देमालाची चोरी करणाऱ्या या तरुणाचा शोध पोलीस अनेक दिवसांपासून करत होते. कुर्ला पश्चिमेच्या ख्रिश्चन गावात 18 मे रोजी चोरीची घटना घडली होती. एका घरामधून तब्बल 25 तोळे सोनं या चोरट्यानं लंपास केलं होतं. याप्रकरणी व्ही.बी.नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

सापळा रचून अटक

वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजीव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उफनिरीक्षक पद्माकर पाटील आणि त्यांच्या पथकानं या चोरट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली. तब्बल दीडशे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना या चोरट्याची माहिती मिळाली. हा चोरटा कुर्ला येथील परिसरात येणार असल्याचं पोलिसांना कळलं होतं. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या चोरट्याच्या मुसक्या आवळल्यात.

हे सुद्धा वाचा

Video : वेल्डिंगच्या एका ठिणगीनं चार घरं पेटली! संसाराची राखरांगोळी

कुर्ल्यातून ताब्यात घेतल्यानंतर या तरुणाकडून दीड किलो चांदी, 14 मोबाईल, हत्यारं, विदेशी नोटा, लॅपटॉप, बनावट दागिने असा मु्द्देमाल जप्त केलाय. ज्या गाडीमधून हा तरुण कुर्ल्यात आला होता, त्या गाडीमध्ये अभिनव याने हे सगळं सामान लपवलेलं होतं.

बारावीनंतर चोरीचा नाद

बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या अभिनवला चोरी करण्याची सवयच होती. चोऱ्या करायच्या, चोरीच्या पैशांतून व्हिडीओ बनवायचे, मुलींवर पैसे उधळायचे, मित्रांसोबत मौजमजा करायची, अशा गोष्टी अभिनव गुप्ता करत होता.