राज्यभरात गर्भपाताच्या औषधांची बेकायदेशीर विक्री, एफडीएची धडक कारवाई, 14 गुन्हे दाखल, तर 11 जणांना अटक
अन्न आणि औषध विभागाने (FDA) महाराष्ट्रभर गर्भपाताच्या औषधांविरोधात ( MTP KIT) धडक कारवाई केलीय. राज्यात कायद्याची पायमल्ली करत अनधिकृतरित्या गर्भपाताची औषधं विकली जात आहेत.
मुंबई : अन्न आणि औषध विभागाने (FDA) महाराष्ट्रभर गर्भपाताच्या औषधांविरोधात ( MTP KIT) धडक कारवाई केलीय. राज्यात कायद्याची पायमल्ली करत अनधिकृतरित्या गर्भपाताची औषधं विकली जात आहेत. किरकोळ विक्रेत्यांकडूनही गर्भपाताची औषधं अवैधरित्या मिळत असल्याचं उघड झालंय. काही ठिकाणी जास्त पैसे घेऊन तर अनेक ठिकाणी डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय, विनापरवाना, विना बिल गर्भपाताच्या औषधांची विक्री सुरू असल्याचं समोर आलंय. एफडीएने केलेल्या या कारवाईत 13 किरकोळ औषध विक्रेत्यांवर कारवाई करून मोठ्या प्रमाणात औषध साठा जप्त करण्यात आलाय.
14 ठिकाणी गुन्हे दाखल, 11 लोकांना अटक
अन्न आणि औषध विभागाने या कारवाईनंतर पश्चिम उपनगरमध्ये रुग्णालय आणि डॉक्टरांवरही गुन्हा दाखल केलाय. आरोपी डॉक्टरने गर्भपात करण्यासाठी कुठली औषधं वापरली त्याची माहिती दिली नाही म्हणून हा गुन्हा नोंदवण्यात आला. या कारवाईत मुंबई, नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती आणि इतर ठिकाणी मिळून 14 ठिकाणी गुन्हे दाखल झालेत. तसेच आतापर्यंत 11 लोकांना अटक करण्यात आली आहे.
“हॉस्पिटल, मेडिकल आणि डॉक्टर कोणीही कायदाची पायमल्ली करू नका”
सर्वसामान्य लोकांनी डॉक्टरांच्या चिट्ठीविना आणि वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नये असं आवाहन अन्न आणि औषध विभागाने केलंय. हॉस्पिटल, मेडिकल आणि डॉक्टर कोणीही कायदाची पायमल्ली करू नका. अन्यथा, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा एफडीएने दिलाय.
हेही वाचा :
अकोल्यातील धक्कादायक प्रकार, नामांकित बेकरीने बुरशीजन्य ब्रेड विकल्याची तक्रार
महागाईचा भडका, इंधनदरवाढीपाठोपाठ खाद्यतेलाच्या किंमती गगनाला, दर काय?
मोठी बातमी: रायगडमध्ये 90 जणांवर रेमडेसिविरचे साईडइफेक्टस; इंजेक्शन्सचा वापर थांबवण्याचे आदेश
व्हिडीओ पाहा :
FDA action against illegal sale of abortion medicine in Maharashtra