मुंबई APMC फळ मार्केटमध्ये स्फोट प्रकरण, मुंबई फिरायला जायचंय, मित्राची कार मागितली, नंतर कारमधून पेट्रोल काढून ट्रक पेटवली

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ मार्केटच्या बहुउद्देशीय इमारतीच्या खाली शुक्रवारी (2 जुलै) रात्री दोन वाजता स्फोट घडवून आणण्यात आला होता (Five arrested on Navi Mumbai APMC Fruit Market eicher car blast case).

मुंबई APMC फळ मार्केटमध्ये स्फोट प्रकरण, मुंबई फिरायला जायचंय, मित्राची कार मागितली, नंतर कारमधून पेट्रोल काढून ट्रक पेटवली
नवी मुंबईच्या फळ मार्केटमध्ये आयशर गाडीत स्फोट
Follow us
| Updated on: Jul 07, 2021 | 10:41 PM

मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ मार्केटच्या बहुउद्देशीय इमारतीच्या खाली शुक्रवारी (2 जुलै) रात्री दोन वाजता स्फोट घडवून आणण्यात आला होता. याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे हा स्फोट घडवून आणणाऱ्या आरोपीदेखील या हल्ल्यात जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. एपीएमसी पोलिसांनी अब्बास खान नावाच्या इसमाला अटक केली होती. त्याचबरोबर त्याचा मुलगा आणि मुख्य आरोपी सोहेल याच्यासह तीन साथीदार आफताब खान, निझमुदिन खान, तौशिफा शेख यांना अटक करण्यात आली आहे. सोहेल आणि त्याचे साथीदार गाडीत स्फोट घडवून आणत असताना अचानक स्फोट झाला. यामध्ये सोहेलाचा चेहरा भाजल्यामुळे तो कोपरखैरणे येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे (Five arrested on Navi Mumbai APMC Fruit Market eicher car blast case).

आरोपींनी नेमकं काय सांगितलं?

नवी मुंबई पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. अब्बासच्या सांगण्यावरून सोहेल आणि त्याच्या तीन साथीदारांनी संबंधित स्फोट घडवून आणला. या प्रकरणी पाच जणांना अटक करून कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी सोहेल याने आपल्या 3 साथीदारांसोबत एका मित्राकडून मुंबई फिरायला जायचं कारण सांगून कार घेतली. त्याने कारमध्ये 500 रुपयांचे पेट्रोल टाकलं. पण मुंबईकडे न जाता त्यांनी फळ मार्केटच्या शेजारी एका कॅनमध्ये गाडीतून पेट्रोल काढलं. त्यानंतर मार्केटमध्ये उभ्या असलेल्या एका ट्रकला आग लावली, असा दावा आरोपी सोहेल याने कबुली जबाबात केला आहे. पण हल्ल्याची भीषणता बघता फक्त पेट्रोलमुळे हा स्फोट झालेला नाही, असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी गाडीचे नमुने फॉरेन्सिक विभागाला पाठवले आहेत. पोलिसांचा पुढच्या तपास सुरू आहे (Five arrested on Navi Mumbai APMC Fruit Market eicher car blast case).

नेमकं प्रकरण काय?

मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये बहुउद्देशीय इमारतीखाली शनिवारी रात्री अडीच वाजता एका गाडीत स्फोट घडवून आणण्यात आला होता. या स्फोटामुळे मार्केट परिसरात मोठी खळबळ उडाली होती. यावेळी फळ मार्केट परिसरातील सीसीटीव्ही बंद असल्याने ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली नव्हती. स्फोटाचा आवाज एवढा भंयकर होता की काहीवेळ काय घडले हा अंदाज बांधणे कठीण झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं होतं. गाडीच्या मागील भागाच्या पूर्ण चिंधड्या झाल्या होत्या. जवळपास 25 ते 30 फूट अंतरावर असलेल्या कार्यालयाच्या काचा तडकल्या होत्या. परिसरात अनेक गाड्या पार्क करण्यात आल्या होत्या. परंतू वेळीच अग्निशामक गाडी आल्याने पुढील दुर्घटना टळली. गाडीमध्ये स्फोटक ठेऊन गाडी उडवण्यात आली, अशी प्रतिक्रिया गाडी चालक राजीव कुमार यादवने दिली होती.

स्फोट घडवून आणल्याचा ट्रक चालकाचा दावा

मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये राजीव कुमार यादव ही व्यक्ती अब्बास नामक व्यक्तीकडे कामाला होती. त्याने काही दिवसांपूर्वी अब्बासकडून गाडी विकत घेतल्याचे सांगण्यात येत आहे. गाडीचे पूर्ण पैसे अब्बास यांना देऊनही त्यांनी गाडी माझ्या नावावर केली नसल्याचं राजीव कुमार यादव या गाडी चालकाने सांगितलं. तर अब्बास आणि गाडी चालकामध्ये गेल्या काही दिवसांपासून कुर्ला येथील माल वाहतुकीवरून वाद असल्याचं समजतं.

साडे सात लाख रुपयात अब्बास यांनी यादव यांना गाडी विकली होती. एक वर्षभरापूर्वी अब्बास यांचा मुलगा रमझान याने गाडीच्या काचा फोडून चालकाला मारहाण केली होती, अशी माहिती मिळतेय. दरम्यान, त्या दिवशी चालकाने दुपारी 4 वाजता गाडी मार्केटमध्ये उभी केली होती. रात्री दोन वाजता फोन आला की गाडी जळत आहे. मी येईपर्यंत गाडी पूर्ण जाळून खाक झाली होती. तर बॅटरी, इंजिन आणि इतर पार्टस गाडीचे शाबूत असल्याने हि घटना शॉटसर्किट मुळे घडली नाही तर ती उडवून देण्याचा प्रयत्न झाल्याचं यादवने सांगितलं. गाडीवर बांधण्यात आलेली ताडपत्री व नायलॉन रस्सी जवळपास तीस फूट उंच उडून जाऊन पडली होती.

संबंधित बातम्या :

नवी मुंबईतील फळमार्केटमध्ये एका गाडीत भीषण स्फोट, परिसरात भीतीचं वातावरण

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.