वरळीतील समुद्रात पाच मुले बुडाली; दोघांचा मृत्यू, तीन जण गंभीर
वरळीतील कोळीवाडा येथे पाच मुले दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास समुद्रात पोहण्यास गेली होती. ही पाचही मुले समुद्रात वाहून गेली.
मुंबई : वरळी कोळीवाड्याजवळ समुद्रात पाच मुले वाहून गेल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. या पाच जणांना स्थानिक नागरिकांनी बाहेर काढून खासगी आणि केईएम रुग्णालयात दाखल केले. यामधील हिंदुजा रुग्णालयात दाखल केलेल्या 8 वर्षीय मुलाचा आणि 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तर इतर तीन मुलांवर खाजगी आणि केएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी रुग्णालयात भेट देत उपचार सुरू असेलेल्या मुलांची विचारपूस केली.
दुपारी साडे तीनच्या सुमारास घडली घटना
वरळीतील कोळीवाडा येथे पाच मुले दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास समुद्रात पोहण्यास गेली होती. ही पाचही मुले समुद्रात वाहून गेली. मुले वाहून जात असल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मुंबई अग्निशमन दल पोहोचण्याआधीच त्यांना समुद्रातून बाहेर काढले.
दोन मुलांचा मृत्यू
स्थानिक नागरिकांनी या मुलांना खासगी वाहनांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र यावेळी दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर वाहून गेलेल्या अन्य तीन मुलांवर केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मुलीच्या प्रकृतीची माहिती उपलब्ध झालेली नाही.
आदित्य ठाकरेंनी घेतली पीडित कुटुंबांची भेट
10 वर्षाचा मुलगा आणि 14 वर्षाच्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु असून मुलाला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही सर्व मुलं वरळी परिसरातील असल्यामुळे स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे यांनी या मुलांच्या कुटुंबियांना भेट देत जखमी मुलांच्या कुटुंबियाची विचारपूस केली.