Mumbai Crime : पोक्सो प्रकरणात दोन वर्षांत पाचव्यांदा जामीन फेटाळला; विशेष कोर्टाचा क्रूर मावशीला झटका

आरोपी महिलेचे भाचीसोबतचे वर्तन अत्यंत क्रूर स्वरुपाचे आहे, असे निरीक्षण विशेष न्यायालयाने नुकतेच निकाल देताना नोंदवले. प्रथमदर्शनी समोर आलेली तथ्ये आणि आरोपींविरुद्धच्या आरोपपत्रात उपलब्ध पुरावे यावरून आरोपीच्या क्रूर कृत्याची तीव्रता सिद्ध होते.

Mumbai Crime : पोक्सो प्रकरणात दोन वर्षांत पाचव्यांदा जामीन फेटाळला; विशेष कोर्टाचा क्रूर मावशीला झटका
पीएफआय प्रकरणातील संशयित आरोपींच्या कोठडीत वाढImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 6:38 PM

मुंबई : लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करणाऱ्या (पोक्सो) कायद्याअंतर्गत खटले चालवणाऱ्या विशेष न्यायालयाने एका महिलेला लहान मुलीचा क्रूरपणे छळ (Assault) केल्याप्रकरणी मोठा झटका दिला आहे. 40 वर्षांच्या आरोपी महिलेने तिच्या 12 वर्षांच्या भाची (Niece)चा अत्यंत क्रूरपणे छळ केला होता. या प्रकरणात तिने तुरुंगातून सुटका करून घेण्यासाठी दोन वर्षांत पाचवेळा विशेष न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. तथापि, न्यायालयाने पाचव्यांदाही तिचा जामीन अर्ज (Bail Application) धुडकावून लावला आहे. तिने भाचीला चिकन आणण्यासाठी बाजारात पाठवले होते. त्यावेळी तिने भाचीकडे 40 रुपये दिले होते. त्यापैकी 10 रुपये भाचीने चॉकलेटसाठी वापरले म्हणून मावशीच्या संतापाचा उद्रेक झाला व तिने भाचीच्या प्रायव्हेट पार्टवर आणि डाव्या मांडीवर गरम चमचा टाकला. याप्रकरणी पोलिसांनी तिला अटक केली होती. अटकेनंतर मागील दोन वर्षांत वेगवेगळी कारणे देत ती जामीनासाठी अर्ज करीत होती. न्यायालयाने प्रत्येक वेळी तिच्या हेतू व कारस्थानावर बोट ठेवले आणि जामीन अर्ज धुडकावून लावला.

आई नसलेल्या मुलीची मावशीने चांगली काळजी घेणे अपेक्षित होते – न्यायालय

आरोपी महिलेचे भाचीसोबतचे वर्तन अत्यंत क्रूर स्वरुपाचे आहे, असे निरीक्षण विशेष न्यायालयाने नुकतेच निकाल देताना नोंदवले. प्रथमदर्शनी समोर आलेली तथ्ये आणि आरोपींविरुद्धच्या आरोपपत्रात उपलब्ध पुरावे यावरून आरोपीच्या क्रूर कृत्याची तीव्रता सिद्ध होते. मावशीने मातृछत्र नसलेल्या सात वर्षांच्या मुलीची काळजी घेणे अपेक्षित होते. या मुलीचे वडील व्यसनी होते, याचा देखील विचार करायला हवा होता. मात्र तिने असे न करता पीडित मुलीचा सांभाळ करताना अत्यंत क्रूरता दाखवली. त्यावरून आरोपी मावशीला गुन्ह्यात अडकवण्यासाठी तिच्याविरूद्ध कोणतीही सामग्री नाही, असे म्हणता येणार नाही, असेही विशेष न्यायालयाने म्हटले आहे.

पोक्सो तरतुदींचा गैरवापर झाल्याचा महिलेचा दावाही फेटाळला

या प्रकरणातील आरोपी महिलेने पोक्सो तरतुदींचा गैरवापर झाल्याचा दावा केला होता. मात्र हा दावाही मान्य करण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. आपल्याविरूद्ध पूर्वीच्या वैमनस्यातून खोटी कथा रचल्याचा आरोप तिने केला होता. हा आरोप न्यायालयाने धुडकावला. अर्जदार मावशीने जामीन मागताना ती गेल्या दोन वर्षांपासून तुरुंगात आहे आणि खटला लवकरच सुरू होण्याची शक्यता नाही, असे म्हणणे न्यायालयापुढे मांडले. तथापि, फिर्यादी पक्षाने तिच्या जामीन अर्जाला विरोध केला आणि वैद्यकीय पुरावे व साक्षीदारांच्या जबाबाचा हवाला दिला. आरोपी मावशीने पाचव्या जामीन अर्जात दावा केला की ती आणि तिची दोन वर्षांची मुलगी (जी तिच्यासोबत तुरुंगात होती) दोघेही गंभीर आजारी आहेत. तिने आधी तिच्या कुटुंबीयांकडे तिच्या मुलाचा ताबा मागितला होता व मुलाला कारागृहात ठेवण्याची परवानगी मागितली होती.

हे सुद्धा वाचा

आरोपी मावशी व तिच्या मुलाच्या प्रकृतीचा अहवाल तुरुंग प्रशासनाकडून मागवला

न्यायालयाने तुरुंग प्रशासनाकडून अहवाल मागवला. त्या अहवालाचा संदर्भ देत न्यायालयाने नमूद केले की, मुलाला ताप येत असल्याने ऑगस्ट 2021 मध्ये तिला रुग्णालयात नेण्यात आले होते. तसेच डिसेंबर 2021 मध्ये देखील दाखल करण्यात आले. मात्र, क्षयरोग आढळला नाही. तिच्या गर्भाशयाच्या बायोप्सीमध्ये कोणतीही लक्षणीय असामान्यता आढळली नाही. डॉक्टरांनी सांगितले होते की, मुलाची प्रकृती चांगली आहे आणि त्याला सर्व पौष्टिक पूरक आहार मिळत आहे. आरोपी मावशीने तिच्यासोबत तुरुंगात असलेल्या तिच्या मुलाला योग्य वैद्यकीय उपचार दिले जात नसल्याचा दावा करण्यासाठी रेकॉर्डवर कोणतीही इतर कागदपत्रे सादर केलेली नाहीत. आरोपी देखील गंभीर आजारी असल्याचे दाखवण्यासाठी रेकॉर्डवर काहीही सादर केलेले नाही. दोन वर्षांत पाचव्यांदा जामिनासाठी दाद मागताना आरोपी महिलेने कोणतेही नवीन कारण पुढे केलेले नाही. त्यामुळे तिचा जामीन अर्ज फेटाळला जात आहे, असेही मत न्यायालयाने व्यक्त केले आहे. (For the fifth time in two years, the special court has rejected bail in the POCSO case)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.