मुंबई : ईडीने मनी लॉड्रिंगच्या आरोपाखाली शेअर बाजाराच्या (Share Market Mumbai) माजी प्रमुखांना अटक (ED Arrest) केली. रवी नारायण (Ravi Narayan) असं अटक करण्यात आलेल्या शेअर बाजाराच्या माजी प्रमुखांचं नाव आहे. याआधी ईडीने शेअर बाजाराच्या माजी एमजी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांना कथित फोन टॅपिंग प्रकरणी अटक केली होती. याच अनुषंगाने सीबीआयकडून, ज्याप्रकरणांची समांतर चौकशी सुरु होती, त्या चौकशी रवी नारायण यांचे काही लोकेशन्स संशयास्पदरीत्या आढळून आले आहेत. त्यामुळे ईडीने त्यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. सध्या रवी नारायण यांची कसून चौकशी सुरु आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात त्यांचाही हात आहे का, याची पडताळणी आणि शोध ईडीकडून घेतला जातोय.
कथिप फोन टॅपिंग प्रकरण मुंबईतही गाजलं होतं. याच प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय रांडे यांनाही अटक करण्यात आली होती. रवी नारायण यांच्याविरोधात ईडीने 14 जुलै रोजी खटला दाखल केला होता. त्यानंतर मंगळवारी त्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
रवी नारायण हे एप्रिल 1994 पासून 31 पासून 2013 पर्यंत एनएसईचे प्रमुख होते. नारायण यांनी 2009 ते 2017 या काळात एनएसईच्या कर्मचाऱ्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे. अवैधरीत्या त्यांनी फोन टॅप केल्याचा आरोप करण्यात आलाय. ईडीचे वकील एन.के पट्टा यांनी दिल्ली कोर्टात नारायण यांच्यावर नेमका आरोप काय आहे, याबाबत माहिती दिली आहे.
पाहा लाईव्ह घडामोडी : Video
रवी नारायण आणि इतर सहआरोपींनी एनएसई आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची फसवणूक करण्यासाठी कट रचला होता. आरोपींनी संजय पांडे यांच्याशी संबंधित एका कंपनीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे फोन टॅप केले. या कंपनीचं नाव आईसेक सर्विस प्रायव्हेट लिमिटेड असं आहे. सायबर सुरक्षेच्या आडून या गोष्टी केल्या गेल्या, असा आरोप करण्यात आला आहे.
चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, अनेक ब्रोकर्सने याचा फायदा उचलला. शेअर बाजाराच्या परिसरात सर्वर लावण्याची परवानगी को-लोकेशन सेवेच्या अंतर्गत दिली जाते. या सेवेमुळे शेअर बाजारात घडत असलेल्या हालचालींवर ब्रोकर्सला नजर ठेवणं शक्य होतं. या को लोकेशन सेवेचा फायदा उचलत अनेक ब्रोकर्स गैरप्रकार करत असल्याचा संशय ईडीला आहे. यातूनच बेकायदेशीरपणे कोट्यवधी रुपये काहींनी कमावले, अशी शंका घेतली जाते आहे.